दुबईत सांस्कृतिक मंत्र्यांच्या भेटीला बॉलीवूडचे सेलिब्रेटी, पाहा कोणकोण होतं

बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींचे दुबई कनेक्शन चाहत्यांना माहिती आहे.
Bollywood Celebrity
Bollywood Celebrityesakal

Entertainment News: बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींचे दुबई कनेक्शन चाहत्यांना माहिती आहे. आता तर कित्येक बॉलीवूडच्या सेलिब्रेटींच्या चित्रपटाचे पोस्टर हे (Bollywood News) दुबईत असणाऱ्या बुर्ज खलिफावर (Burja Khalifa) झळकताना दिसतात. सध्या चर्चेत आलेल्या काश्मीर फाईल्सला दुबईमध्ये ग्रीन सिग्नल मिळाल्याचे दिसून आले आहे. कोणत्याही कट्सविना हा चित्रपट दुबईतील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान बॉलीवूडमधील प्रमुख सेलिब्रेटी हे (Bollywood Actors) सध्या दुबई वारीला गेल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. त्यांचे काही फोटोही व्हायरल झाले असून त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंटसही दिल्या आहे.

एकीकडे बॉलीवूडचा किंग खान शाहरुख (Shah rukh Khan) हा त्याच्या पठाण या चित्रपटावरुन चर्चेत आला आहे. त्यानं साऊदीमध्ये सांस्कृतिक मंत्री बद्र बिन फरहान अल सऊद यांची भेट घेतली आहे. यावेळी अक्षय कुमार, सलमान खान, (salman khan) सैफ अली खान या सेलिब्रेटींनी देखील त्यांची भेट घेतल्याचे दिसून आले आहे.

saif ali khan
saif ali khan

हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुखनं त्याच्या मन्नतमध्ये साऊदी अरबच्या रेड फिल्म सी फेस्टिव्हलचे अध्यक्षांची भेट घेतली होती. यावेळी त्यांची काही महत्वाच्या गोष्टींवर चर्चा झाल्याचे दिसून आले. मात्र आता जे फोटो व्हायरल झाले आहेत त्याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

akshay kumar
akshay kumar

रेड सी फिल्म फेस्टिव्हलचे अध्यक्ष मोहम्मद अल तुर्की यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शाहरुखसोबत फोटो शेयर केला आहे. त्या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी लिहिले आहे की, माझा भाऊ शाहरुख याला रमजानच्या मनपूर्वक शुभेच्छा. हा फोटो त्यांनी मन्नत असा टॅग वापरुन शेयरही केला आहे.

salman khan
salman khan

याशिवाय साऊदीचे सांस्कृतिक मंत्री बद्र बिन फरहान यांनी देखील इंस्टावरुन काही फोटो शेयर केले आहेत. त्यावेळी अक्षय, सलमान आणि सैफही त्यात दिसत आहे.बॉलीवूडच्या रथी महारथी सेलिब्रेटींनी दुबईतील सांस्कृतिक मंत्र्यांची भेट घेण्यामागे काय कारण आहे असा प्रश्न यावेळी नेटकऱ्यांनी विचारला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com