Aryan Khan: किंग खानच्या मुलाविरोधात हिंदू महासंघ उच्च न्यायालयात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Aryan Khan

Aryan Khan: किंग खानच्या मुलाविरोधात हिंदू महासंघ उच्च न्यायालयात...

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेली होती. संपूर्ण देशभरात हे प्रकरण चांगलच तापलं होतं. मात्र काही दिवसांनी आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज असल्याचे पुरावे सापडले नसल्यानं एनसीबीकडून त्याला क्लिनचिट देण्यात आली. मात्र आता आर्यन खान च्या क्रुझवरील अंमली पदार्थ प्रकरणी झालेल्या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे.

हेही वाचा: Shah Rukh Khan: 'उमराह' करण्यासाठी शाहरूख खानची मक्का मदिनाला भेट

हिंदू महासंघाचे संस्थापक आनंद दवे, अॅड. सुबोध पाठक (पालघर) यांनी आज पुण्यात याविषयी माहिती दिली. ॲड सुबोध पाठक म्हणाले, "आर्यन खानला घटनास्थळी मुंबई अमली पदार्थ विभागाने रंगेहात पकडले होते. त्याचप्रमाणे आर्यन खान यानेही गुन्हा मान्य असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी मान्यही केलं होतं. त्याचा आधारावर सत्र न्यायालयाने दोन वेळा त्याचा जामीन नाकारला होता मात्र तपास यंत्रणांनी आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन आर्यन खान आणि त्याच्या सहकाऱ्यांना सबळ पुरावा नसल्याचे कारण देत त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत की नाही ते न्यायालयात खटल्या दरम्यान टिकणार की नाही ही बाब ठरविण्याचा अधिकार न्यायालयाचा आहे मात्र आरोपींना निर्दोष मुक्त करून न्यायालयाच्या अधिकारावर पोलिसांनी अतिक्रमण केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे."

हेही वाचा: First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

या संपूर्ण घटने विरोधात हिंदू महासंघाने 13 जुलै 2022 रोजी कोर्टात आव्हान दिले असून या संपूर्ण प्रक्रियेत तपास यंत्रणा किती गाफिल राहिल्या, त्यांनी कशाप्रकारे त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन या सर्व आरोपीना मदत केली, हे मुद्देही उपस्थित केले आहेत. याप्रकरणी तब्बल 36 पानांची कागदपत्रे कोर्टात दाखल केली आहेत. त्यामूळे पुन्हा अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.