शाहिदचा 'जर्सी' जिंकला! कोर्टानं दिला 'ग्रीन सिग्नल', 22 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला|Bollywood Actor Shahid Kapoor Jersey movie | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shahid kapoor

शाहिदचा 'जर्सी' जिंकला! कोर्टानं दिला 'ग्रीन सिग्नल', 22 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला

Bollywood Actor: शाहिद कपूरच्या जर्सीचं प्रदर्शन लांबणीवर ढकलण्यात आलं (Bollywood Movies) होतं. त्यामागील कारण म्हणजे या चित्रपटावर स्क्रिप्ट (Shahid Kapoor) चोरीचा आरोप करण्यात आला होता. यापूर्वी त्याच्यावर (Plagiarism) कोणत्याही स्वरुपाचा वाद नव्हता. मात्र प्रदर्शनाच्या दोन दिवस अगोदर तो वाद चर्चेत आल्यानं निर्मात्यांची डोकेदुखी वाढली होती. उद्या टॉलीवूडमधील दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये थलापती विजयचा बिस्ट आणि यशचा केजीएफ 2. या दोन्ही चित्रपटांच्या दडपणामुळे शाहिदनं आपल्या जर्सी चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्य़ात आल्याचे सांगण्यात आले होते. आता मुंबई हायकोर्टानं जर्सीला दिलासा दिला आहे. येत्या 22 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कोर्टानं जर्सीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. स्क्रिप्ट चोरीचा आरोप करण्यात आल्यानंतर निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. लेखक रजनिश जैसवाल यांनी 'जर्सी' सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार नोंदवलीय की,''जर्सी सिनेमाची मूळ कथा-पटकथा त्यांची आहे. मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती छगला यांच्यापुढे या केसची सुनावणी ११ एप्रिल रोजी होणार होती. म्हणूनच 'जर्सी' सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्याचं हे एक मुख्य कारण आहे असं म्हटलं जात आहे. जर्सी सिनेमाचं दिग्दर्शन गोथम तिन्नानुरीनं केलं आहे. तर सिनेमाचे निर्माते आहेत दिल राजू,एस.नागा वामसी आणि अमन गिल. निर्माते गील यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की,''आम्ही जर्सी साठी खूप मेहनत घेतली आहे. हा चित्रपट मोठ्या संख्येनं प्रेक्षकांपर्यंत आम्हाला पोहोचवायचा आहे. म्हणूनच सगळा विचार करुन आम्ही २२ एप्रिलला सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे''.

हेही वाचा: Video Viral: 'चंद्रा'ची सोनालीला भुरळ! नृत्यानं नेटकरी भारावले...

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शाहिद कपूरचा हा प्रोजेक्ट रखडल्याचे दिसुन आले आहे. त्याच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. 'जर्सी' सिनेमात शाहिद कपूर,मृणाल ठाकरू,शाहिदचे वडील अभिनेते पंकज कपूर अशी स्टारकास्ट दिसणार आहे. हा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. खेळात अपयशी ठरलेला एक क्रिकेटर केवळ आपल्या मुलाला जर्सी गिफ्ट द्यायची आहे म्हणून वयाच्या तिशीनंतर जिद्दीनं पेटून उठतो अन् क्रिकेटचा स्टार कसा बनतो याचा प्रवास सिनेमात दाखवण्यात आला आहे.

हेही वाचा: Video Viral: असशील 'KGF2' चा मोठा स्टार बरं मग?, यशनं मागितली माफी

Web Title: Bollywood Actor Shahid Kapoor Jersey Movie Mumbai High Court Green Signal Plagiarism Alligations

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..