esakal | शाहिद साकारणार श्री छत्रपती शिवरायांची भूमिका?; चाहत्यांना लागली उत्सुकता

बोलून बातमी शोधा

bollywood actor shahid kapoor will play the role of chhatrapati shivaji maharaj in upcoming movie}

या चित्रपटामध्ये शाहिद कपूर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. 

शाहिद साकारणार श्री छत्रपती शिवरायांची भूमिका?; चाहत्यांना लागली उत्सुकता
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर नेहमीच आव्हानात्मक भूमिकेच्या शोधात असतो. सध्या बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक चित्रपट निर्मितीचा ट्रेंड आला आहे. पद्मावत, बाजीराव मस्तानी या ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. लवकरच श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये शाहिद कपूर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. 

अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली; करावी लागणार सर्जरी

प्रसिद्ध चित्रपट निर्माते अश्विन वर्दे लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे काम सुरु करणार आहेत. अश्विन वर्देंच्या 'कबीर सिंग' चित्रपटामधील शाहिदच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. कबीर सिंगने बॉक्स ऑफिसवर देखील प्रचंड कमाई केली. कबीर सिंग चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवनावर आधारित शाहिद आणि अश्विनची जोडी पुन्हा एकत्र येणार आहे. चित्रपटासाठी निर्मात्यांने साउथ चित्रपटसृष्टीतील लायका प्रोडक्शन या मोठ्या कंपनीसोबत पार्टनरशिप केली आहे. 

जेव्हा हृतिक म्हणाला, "..म्हणून मी दुसऱ्या लग्नाचा विचार करत नाही"

काही दिवसांपूर्वी शशांक खेतान आणि धर्मा प्रोडक्शनच्या 'योध्दा' चित्रपटात शाहिद काम करणार असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. पण शाहिद कपूरने हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे. शाहिदसोबत दिशा पाटनी चित्रपटातील प्रमुक भूमिकेत दिसणार होती. शाहिद कपूर जर्सीचे शूटिंग पूर्ण होताच या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार होता, पण आता शाहिदनेच चित्रपटास नकार दिला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शाहिद कसा अभिनय करेल याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली आहे.