
Shahrukh Khan: बॉलीवूडचा किंग खान शाहरुख हा आता सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी शाहरुखवर टीका केली होती. आर्यन खानच्या प्रकरणात आपण शाहरुखला सर्वोतोपरी मदत केली होती. मात्र त्यानं आर्यन (Aryan Khan) तुरुंगातून बाहेर आल्यावर थँक्यु म्हणण्यासाठी देखील फोन केला नाही. त्यामुळे आपल्याला वाईट वाटले. अशी प्रतिक्रिया शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली होती. शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रतिक्रियेवरुन शाहरुखला सोशल मीडियावर मोठ्या (entertainment news) प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. आता शाहरुख त्याच्या मुलीच्या बॉयफ्रेंडला दिलेल्या धमकीवरुन ट्रोल झाला आहे.
कोरोनाच्या काळात शाहरुखच्या चित्रपटांना ब्रेक लागला होता. त्यामुळे येत्या (Bollywood King Khan Shahrukh) वर्षात त्याचे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे कळते आहे. त्याची माहिती त्यानं सोशल मीडियावरुन दिली आहे. दुसरीकडे त्याची मुलगी सुहानाही सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांचे लक्ष (Bollywood Actors) वेधून घेताना दिसते आहे. तिचे पार्टीतील फोटो नेटकऱ्यांच्या कौतुकाचा विषय आहेत. सुहाना आता 'The Archies' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान शाहरुखनं सुहानच्या बॉयफ्रेंडला दिलेल्या धमकीमुळे तो चर्चेत आला आहे. एका मुलाखतीमध्ये त्यानं ही गोष्ट सांगितली होती.
कॉफी विथ करणच्या शो मध्ये जेव्हा शाहरुख आला होता. तेव्हा त्यानं करणला ही गोष्ट सांगितली. तो म्हणाला, मी माझ्या फॅमिलीसाठी हवं ते योगदान देऊ शकतो. माझं नेहमीच त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य असते. करणनं या मुलाखतीमध्ये शाहरुखला सुहानाच्या बॉयफ्रेंडशी संबंधित एक प्रश्न विचारला होता. तेव्हा शाहरुखनं जे उत्तर दिलं त्यामुळे करणला काय बोलावे हेच सुचेना.
शाहरुख तुझ्या मुलीला कोणी मारण्याचा प्रयत्न करेल किंवा तिला कुणी किस करेल तेव्हा तुझी प्रतिक्रिया काय असेल असा प्रश्न करणनं विचारला होता. यावेळी शाहरुख म्हणाला, मी त्या व्यक्तीला सोडणार नाही. मी त्या व्यक्तीच्या ओठांना गंभीर इजा केल्याशिवाय शांत बसणारच नाही. अशी प्रतिक्रिया शाहरुखनं दिली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.