
Shiney Ahuja Birthday : 'त्या' एका चुकीने शायनीचं अख्ख करियर उध्वस्त झालं..
एकेकाळी बॉलीवूडमध्ये अत्यंत वेगाने प्रसिद्धीस आलेला अभिनेता शायनी अहुजाचा (shiney ahuja) आज वाढदिवस. पण हा अभिनेता आज जवळपास मनोरंजन विश्वातून हद्दपार झाला आहे. आज कदाचित तो मोठा स्टार होऊ शकला असता किंबहूना तसा विश्वास त्याने निर्माण केला होता. पण त्याच्या हातून एक चूक घडली आणि त्याचं अख्ख आयुष्य उध्वस्त झालं. नेमकी काय होती ही चूक ज्याची त्याला एवढी मोठी किंमत मोजावी लागली.
हेही वाचा: रक्त उसळवणारा 'सरसेनापती हंबीरराव'चा ट्रेलर चुकूनही चुकवू नका..
शायनीचा जन्म 15 मे 1975 रोजी डेहराडूनमध्ये झाला. एक काळ असा होता की, हा अभिनेता बॉलिवूडचा चेहरा बनेल कि काय असे वाटत होते. त्याच्यावर चाहत्यांचे असलेले प्रेम पाहून अनेक बड्या कलाकारांनाही आश्चर्य वाटे. शायनीने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. 'हजारों ख्वाहिशे ऐसी' या पहिल्याच चित्रपटातून शायनीने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुष पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी शायनीचे विशेष कौतुक झाले.
हेही वाचा: 'चितळेंची फक्त बाकरवाडी, केतकी तर..' राष्ट्रवादीच्या या नेत्याची गंभीर टीका
चित्रपट क्षेत्रातील त्याची वाटचाल वेगात सुरु असतानाच त्याच्याबद्दल एक अशी बातमी आली, ज्याने संपूर्ण मनोरंजन विश्व हादरवून सोडले. घरातील मोलकरणीवर त्याने बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर झाला आणि त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. हाच त्याच्या आयुष्यातील काळा दिवस ठरला. ही बातमी वेगात पसरली आणि शायनीची मोठी बदनामी झाली. त्याच्या बहरत असलेल्या कारकीर्दला गालबोट लागले. ही चूक अशी होती की मनोरंजन विश्वानेही त्याच्यासाठी दारं बंद केली.
बलात्काराच्या आरोपानंतर शायनी जवळपास दोन वर्षे इंडस्ट्रीतून गायब होता. चाहतेही त्याला विसरून गेले. 2012 मध्ये शायनीने 'भूत' चित्रपटातून पुनरागमन केले, मात्र या चित्रपटाला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तब्बल पुन्हा दोन वर्षे शायनीने काहीच केले नाही. 2015 मध्ये ‘वेलकम बॅक’ या चित्रपटात तो दिसला, पण त्यानंतर त्याने या क्षेत्राकडे पाठ फिरवली. बलात्काराचा आरोप झाल्यानंतर शायनीला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याला जामीनही मिळाला पण शायनी मात्र बॉलिवूडमध्ये पुन्हा आपले स्थान निर्माण करू शकला नाही.
Web Title: Bollywood Actor Shiney Ahujas One Mistake Destroy His Career
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..