Sonu Sood news
Sonu Sood news SAKAL

Sonu Sood: "अरे गुटखा का खाताय, बंद करा", सोनू सूदने केली कानउघडणी

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद त्यांच्या अभिनयापेक्षा सामाजिक कार्यामुळे जास्त चर्चेत असतो.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद त्यांच्या अभिनयापेक्षा सामाजिक कार्यामुळे जास्त चर्चेत असतो. सोनू सूदने कोरोनाच्या काळात सुरू केलेली गरजूंना मदत केली. आता त्याच्या घराबाहेरही अनेकदा शेकडो फॅन्सची गर्दी असते. सोनू सूद सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.

अनेकदा तो त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकत्याच एका व्हिडिओत सोनू गुटखा खाणाऱ्या व्यक्तीला फटकारताना दिसला आहे.

Sonu Sood news
Bigg Boss 16: घरातून बाहेर पडताच अब्दु रोजिक-साजिद खानने फराह खानच्या घरी केली जंगी पार्टी

झालं असं की अलीकडेच सोनू सूदने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सोनू सुद नागपूर चंद्रपूर रोडवर रात्री प्रवास करतोय. तो रस्त्याच्या कडेला कॉफी प्यायला गेला होता.

यादरम्यान एक व्यक्ती त्याला भेटतो, जो गुटखा खात आहे. त्यावर सोनुने त्याची चांगलीच शाळा घेतली. सोनू सूद म्हणतो, “तुम्ही गुटखा खाल्ला का? गुटखा खाणे बंद करा. गुटखा आधी फेकून दे."

इतकेच नव्हेतर सोनू सूदने त्या व्यक्तीला त्याचे नाव देखील विचारले, ज्यावर त्याने उत्तर दिले की माझे नाव नागेश आहे. तेव्हा सोनू सूद म्हणतो की नागेश पुढे कधीही गुटखा खाऊ नकोस. सोनू सूद सुपारी दुकान मालकाला सांगतो की त्याला गुटखा दिल्याने त्याचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे, असा सल्ला देतो.

Sonu Sood news
Rakhi Sawant: मै शादीशुदा हू.. म्हणत राखी सावंतचा नवा ड्रामा.. म्हणाली, माझ्यापासून जरा..

इतकेच नव्हेतर सोनू सूदने त्या व्यक्तीला त्याचे नाव देखील विचारले, ज्यावर त्याने उत्तर दिले की माझे नाव नागेश आहे. तेव्हा सोनू सूद म्हणतो की नागेश पुढे कधीही गुटखा खाऊ नकोस. सोनू सूद सुपारी दुकान मालकाला सांगतो की त्याला गुटखा दिल्याने त्याचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे, असा सल्ला देतो.

सोनू सुद लवकरच वास्तविक जीवनातील घटनांपासून प्रेरित, 'फतेह' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात सोनू सूदचा कधीही न पाहिलेला अवतार दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com