'सुपरस्टार असलो तर काय झालं महागाईचा फटका आम्हाला बसतो', Suniel Shettyचं वक्तव्य चर्चेत

Bollywood Actor Suniel Shetty Reaction eating less tomato due to high price viral
Bollywood Actor Suniel Shetty Reaction eating less tomato due to high price viral Esakal

Suniel Shetty Reaction On Tomato Hike Price: पावसाळा सुरु होताच पालेभाज्यांचे भाव वाढतात. हे अगदी सहाजिक आहे. मात्र गेल्या काही दिवासांपासून टोमॅटोचे दर मात्र गगनाला भिडले आहे. देशभरात टोमॅटोचे दर असून यामुळे सामान्य जनतेच्या खिशाला कात्री बसली आहे.

अनेक भागांमध्ये टोमॅटोच्या किंमती 150 रूपये किलोंपेक्षा जास्त झाल्या आहेत. त्यामुळे गृहणींनी त्याच्या किचनमध्ये टोमॅटोचा वापर कमी केला आहे. काही दिवसांत टोमॅटोचे भाव कमी होतील अशी अपेक्षा होती.

मात्र उलट त्याची किंमत आणखी वाढू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र या भाववाढिचा फटका केवळ सर्वसामान्यांनाच नाही तर कलाकरांनाही पडला आहे. टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे बॉलिवूडमधले कलाकरही चिंतेत आहे.

Bollywood Actor Suniel Shetty Reaction eating less tomato due to high price viral
RRKPK What Jhumka Song : जुन्याच गाण्याला नवीन चाल, बाकी सगळं बेताल!

सुनील शेट्टी यांनी टोमॅटोच्या दराबाबत आता वक्तव्य केले आहे. सुनील शेट्टी म्हणाला की, 'माझी बायको घरी फक्त दोन दिवस पुरेल इतकाच भाजीपाला आणते.

ताज्या भाज्या खाण्यावरच आम्ही भर देतो. मात्र, आजकाल टोमॅटोच्या किमती वाढत आहेत, त्याचा परिणाम आपल्या घराच्या स्वयंपाकघरावरही होत आहे. आजकाल मी टोमॅटो कमी खायला सुरुवात केली आहे.

असं होऊ शकतं की, लोकांना वाटेल की, तो सुपरस्टार आहे त्यामुळे महागाईचा त्याच्यावर काय परिणाम होईल. पण तसं काही नाही. आम्ही देखील या सगळ्या गोष्टींमधून आम्हीही जातो.'

Bollywood Actor Suniel Shetty Reaction eating less tomato due to high price viral
Aditya Roy-Ananya Panday : और प्यार हो गया! अखेर अनन्या अन् आदित्य एकमेकांच्या प्रेमात गुंग, व्हिडिओ व्हायरल

पुढे सुनिल म्हणतो की, तुमचा विश्वास बसणार नाही, "मी एका अॅपवरून भाज्या ऑर्डर करतो. तिथे भाज्यांचे भाव बघितले तर थक्क व्हाल. त्यात भाजीपाला हा मार्ट किंवा भाजी मंडईपेक्षा खुप कमी दरात मिळतो.

या अॅपवर भाजीपाला स्वस्त भेटतो म्हणुन मी तो वापरत नाही तर तिथे ताजा भाजीपाला मिळतो, माल कोठून आला, कोणत्या मातीत तयार झाला, या सर्व गोष्टींची माहिती तिथे असते.

हे सर्व पाहून मी समाधानी झालो आणि तिथूनच भाजीपाला खरेदी करतो. या खरेदीचा फायदा हा थेट शेतकऱ्यांना होतो. त्यांनी स्वतः पिकवलेला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवला जातो."

Bollywood Actor Suniel Shetty Reaction eating less tomato due to high price viral
Thalapathy Vijay: थलापती असशील तू तुझ्या घरी! नियम तोडला आता दंड भर

इतकच नाही तर सुनिल पुढे म्हणतो की, तो एक अभिनेता असला तरी त्याचे हॉटेलही आहे. त्यामुळे तो प्रत्येक वस्तू खरेदी करतांना मोलभाव करतो.

आता महागाई आहे, टोमॅटोचे भाव वाढले असल्याने खाण्याबाबत तुम्हाला थोडं तडजोड करावी लागते. त्याने वाढती महागाईमुळे त्याने खंडाळ्याच्या फार्महाऊसमध्ये भाजीपाला लावला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com