RRKPK What Jhumka Song : जुन्याच गाण्याला नवीन चाल, बाकी सगळं बेताल!

आलिया-रणवीरच्या त्या गाण्यानं मात्र अनेकांची निराशा केली आहे. जुनेच गाणे आहे मात्र चाल नवी देण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
RRKPK What Jhumka Song
RRKPK What Jhumka Songesakal

RRKPK What Jhumka Song : रॉकी और रानी या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे.त्याचा गेल्या काही दिवसांपूर्वी ट्रेलर व्हायरल झाला होता. त्यालाही चाहत्यांचा आणि नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटातील झुमका गिरा रे नावाचे गाणे प्रदर्शित झाले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून प्रदर्शित झालेल्या चित्रपटांकडे पाहिल्यास त्यातील गाणी ही यापूर्वीचे हिंदी चित्रपट, अन्य भाषांमधील चित्रपटांमधील गाण्याची कॉपी करण्याची लाट आल्याचे चाहत्यांचे, नेटकऱ्यांचे निरीक्षण असल्याचे दिसून आले आहे. पठाणमधील शाहरुखवर बेतलेले झुमे जो पठाण नावाचे गाणे प्रदर्शित झाले होते तेव्हा पाकिस्तानातील एका गायकानं शाहरुखनं आपले गाणे चोरल्याचे म्हटले होते. यानंतर आता रणवीर सिंगचे एक गाणे चर्चेत आले आहे.

Also Read - Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

आलिया भट्ट आणि रणवीर सिंगच्या त्या गाण्याचे बोल झुमका गिरा रे हे असून पूर्वीच्या काळातील एका हिंदी चित्रपटातील या गाण्याची कॉपी करण्यात आल्याचा आरोप नेटकऱ्यांनी मेकर्सवर केला आहे. अनेकांना ते गाणं कमालीचे आवडले आहे. अनेकांनी रणवीर आणि आलियाच्या केमिस्ट्रीला पसंदही केले आहे. रॉकी आणि राणीची कहानी अनेकांच्या कुतूहलतेचा विषय आहे. काही दिवसांपूर्वी रणवीर सिंगचे तुम क्या मिले नावाचे गाणे प्रदर्शित झाले होते.

आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या गाण्यानं नेटकऱ्यांना कोड्यात टाकले आहे. ते म्हणजे या गाण्यात रणवीर सिंगचा डान्स सोडता नवीन काय आहे. पूर्वीचीच गाणी फक्त नव्या चालीत सादर करुन प्रेक्षकांची वाहवा मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याच्या प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. यासगळ्यात काही आलियावरही नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. आलियाच्या व्हाट झुमका हे गाणं अनेकांच्या रागाचे कारण ठरताना दिसत आहे.

RRKPK What Jhumka Song
Shah Rukh Khan Movie : बॉलीवूडमधला सगळ्यात महागडा अभिनेता! एका चित्रपटाचे राईट्स तो...

मेकर्सनं भलेही अन्य कुठल्या गाण्याची जशास तशी कॉपी केलेली नाही. मात्र जी थोडी फार कॉपी आहे त्यात ये जवानी है दिवानीमधील रणबीरच्या बत्तमीज दिल गाण्याची झलक व्हाट झुमकामध्ये दिसून येते. तसेच झुमका गिरा रे गाण्याची चालही जशीच्या तशी वापरण्यात आली आहे. यासगळ्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया भलत्याच भन्नाट असल्याचे दिसून आले आहे.

RRKPK What Jhumka Song
Shah Rukh Khan : हेमा मालिनीच्या गुरु माँ यांनी केली होती शाहरुखची भविष्यवाणी, 'हा मुलगा एक दिवस...'

अरिजित सिंह च्या आवाजातील त्या गाण्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. करण जोहरची निर्मिती असलेल्या या चित्रपटातील दुसरे गाणे प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसत आहे. आता चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून अरिजित सिंगच्या आवाजातील वेगवेगळ्या गाण्यांना आतापर्यत चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com