पुलवामा येथील दहशतवादी हल्लात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना सर्वच क्षेत्रातील लोकांनी श्रध्दांजली वाहिली. यातच या हल्ल्याचा निषेध अभिनेता विकी कौशल कोणत्या शब्दात करेल याकडे त्याच्या चाहत्यांचे विषेश लक्ष लागले होते. कारण उरी येथे झालेल्या हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवरील चित्रपटात विकी मुख्य भूमिकेत होता.
विकीनेही पुलवामा हल्लाचा कडाडून निषेध व्यक्त केला.
विकी म्हणाला, '14 फेब्रुवारीला झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात गमावलेल्या आपल्या बांधवांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी आता भरुन निघणे शक्य नाही. देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या मृत्युनंतर माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तींना गमावल्याचे दु:ख मला जाणवत आहे. मात्र या हुतात्म्यांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी आपल्या सगळ्यांना एकत्र येण्याची गरज आहे. देशातील साऱ्या जनतेने आता एकत्र येऊन हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढे करा. आता शांत बसण्यात अर्थ नाही. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला आपण जशास तसे उत्तर द्यायला हवे. त्यांना सडेतोड उत्तर देण्याची हीच खरी वेळ आहे.'
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.