अभिनेता विद्युत जामवाल चाहत्यांसोबत लाईव्ह बघणार 'खुदा हाफिज'

संतोष भिंगार्डे
Wednesday, 12 August 2020

'कमांडो' सारख्या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन दाखविणारा विद्युत या सिनेमातही एका वेगळ्या प्रकारच्या अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे. तसंच अॅक्शनसोबत या चित्रपटातील या जोडप्यामधील प्रेमळ क्षणही लक्ष वेधून घेतात. 

मुंबई : 'फोर्स', 'जंगली', 'कमांडो' यासारख्या चित्रपटातून अॅक्शन हिरो म्हणून आपली ओळख निर्माण केलेला अभिनेता विद्युत जामवाल याचा 'खुदा हाफिज' हा चित्रपट  14 ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे. याच निमित्ताने स्वतः विद्युत जामवाल डिस्नी हॉटस्टारवर लाईव्ह येऊन त्याच्या चाहत्यांसोबत या चित्रपटाचा 'फर्स्ट डे, फर्स्ट शो' बघणार आहे. तो फक्त लाईव्ह येऊन हा चित्रपट पाहणार नाही, तर चाहत्यांशी संवादही साधणार आहे. यावेळी तो चाहत्यांना चित्रपट कसा वाटला आणि त्यांचा हा चित्रपट पाहण्याचा अनुभव कसा होता हे जाणून घेईल.

नवी मुंबईतील खासगी रुग्णांच्या लुटमारीला महापालिकेचा चाप; आयुक्तांकडून कारवाईचा इशारा

या रोमँटिक अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपटात विद्युत एका पतीच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्याची पत्नी बेपत्ता झाली आहे. या चित्रपटात शिवालिका ओबेरॉयही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. फारूक कबीर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. 'खुदा हाफिज' ही एक अशी जोडप्यांची कहाणी आहे ज्यांनी उत्तम करियरच्या शोधात परदेशात काम करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटात विद्युत समीरची भूमिका साकारताना दिसणार आहे, तर शिवालिका नरगिसच्या म्हणजेच समीरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात नरगिस रहस्यमय परिस्थितीत बेपत्ता होते. बेपत्ता होण्याआधी तिचं फोनवर शेवटचं बोलणं समीरशी होतं. एका असहाय्य पतीप्रमाणेच समीर आपल्या पत्नीचा शोध घेण्यास सुरवात करतो आणि नंतर तिला शोधण्यासाठी त्याला काय काय करावं लागतं हे या सिनेमात दाखवलं आहे.

IPL खेळण्याचं स्वप्न अधूरं! मुंबईकर क्रिकेटपटूनं संपवलं जीवन

'कमांडो' सारख्या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन दाखविणारा विद्युत या सिनेमातही एका वेगळ्या प्रकारच्या अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे. तसंच अॅक्शनसोबत या चित्रपटातील या जोडप्यामधील प्रेमळ क्षणही लक्ष वेधून घेतात. 
---
संपादन ः ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood actor vidyut jamwal will watch his film khuda hafiz with fans