Vijay Raaz Birthday: 'मी कुणापेक्षाही कमी नाही!' कौआ बिर्याणी ते रजियापर्यंत दमदार प्रवास

बॉलीवूडमध्ये असे काही कलाकार आहेत जे कायम प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिले आहेत.
Bollywood Actor Vijay Raaz Birthday
Bollywood Actor Vijay Raaz Birthday esakal
Updated on

Bollywood News: बॉलीवूडमध्ये असे काही कलाकार आहेत जे कायम प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिले आहेत. त्यांचा अभिनय हा नेहमीच प्रेक्षकांना भावला आहे. (Actor Vijay Raaz) भलेही त्या कलाकारांच्या वाट्याला मुख्य अभिनेत्याची किंवा लीड रोलची भूमिका निभावण्याची संधी मिळाली नसेल मात्र त्यांच्या वाट्याला ज्या (Bollywood Movies) भूमिका आल्या त्याचे त्यांनी सोने केले आहे. असाच एका अभिनेता विजय राज. या अभिनेत्याचा विनोदी अभिनेता म्हणून प्रवास सुरु झाला. (Social media News) त्यानंतर त्यानं आपल्या आगळ्या भूमिकेनं प्रेक्षकांना जिंकून घेतले. कौआ बिर्याणी ते गंगुबाई काठिय़ावाडमधील रजिया पर्यत त्याच्या (Entertainment News) वेगवेगळ्या भूमिकांनी प्रेक्षकांना आपलंस केलं आहे.

बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते विजय राज यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्तानं आपण त्याच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत. सुरुवातीला मोठ्या संघर्षातून आपली वेगळी वाट निर्माण करणाऱ्या विजयच्या वाट्याला मोठं यश आलं आहे. त्याची लोकप्रियताही मोठी आहे. त्यानं गेल्या वर्षांपासून प्रेक्षकांची अमाप लोकप्रियता मिळवली आहे. विनोदी ते गंभीर वेगवेगळ्या भूमिका प्रभावीपणे साकारत त्यानं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सोशल मीडियावरही विजय हा नेहमीच सक्रिय असणारा अभिनेता आहे. त्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असतो. 1963 मध्ये दिल्लीमध्ये जन्म झालेल्या विजयनं दहा वर्षे थिएटर केलं. त्यानंतर त्यानं चित्रपटांची वाट धरली.

actor vijay raaz birthday
actor vijay raaz birthdayesakal
Bollywood Actor Vijay Raaz Birthday
'बूढ़ा' कमेंटवरुन 'कपिल शर्मा शो' मध्ये घडलं रामायण? कमल हासनचा Video Viral

एका मुलाखतीमध्ये विजयनं त्याच्या प्रवासाविषयी सांगितलं होतं. त्यावेळी तो म्हणाला होता की, बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक सरस असे अभिनेते आहेत. ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. मात्र आपण स्वताला कमी समजायचे नाही. प्रेक्षक जेव्हा आपल्याला पाहायला थिएटरमध्ये येतात तेव्हा त्यांचे मनोरंजन करणे त्यांना खूश करणे ही आपली जबाबदारी आहे. ती आपण प्रामाणिकपणे पार पाडणे हे कलाकाराचे कर्तव्य आहे. ते केले की मग बाकी कसलीही अपेक्षा करायची नाही. प्रेक्षकांना तुमचं कौतुक करु द्या. त्यांना तुमचं काम आवडल्यानंतर ते तुम्हाला डोक्यावर घेतातच. असा माझा आजवरचा अनुभव आहे. अशी भावना विजयनं त्या मुलाखतीमध्ये दिली होती.

Bollywood Actor Vijay Raaz Birthday
Bollywood VS South: कमाईतही टॉलीवूड दिग्दर्शक 'टॉपर', बॉलीवूड 'काठावर'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com