
बॉलिवूडचे खलनायक सलीम घोष यांचं आज निधन झालं आहे.
अभिनेते सलीम घोष यांचं निधन; वयाच्या 70 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बॉलिवूडचे खलनायक सलीम घोष (Salim Ghosh) यांचं गुरुवारी हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्यानं निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. सलीम घोष यांनी कलयुग, सोल्जर, मंथन, कोयला, चक्र, सारांश, सरदारी बेगम, मोहन जोशी हाजिर हो, त्रिकाल, आघात अशा चित्रपटांमध्ये काम केलंय.
याशिवाय, घोष यांनी हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटात काम केलं आहे. तसेच टेलिव्हिजनवरील मालिकांमध्येही ते खलनायकाच्या रुपात दिसले आहेत. अभिनेता विवान शाह यानं सलीम घोष यांच्या निधनाचं वृत्त ट्विटरवरून शेअर केलंय.
हेही वाचा: धर्म संसदेत भडकाऊ भाषण; वसीम रिझवी, नरसिंहानंदांनंतर दिनेशानंद यांना अटक
1978 मध्ये सलीम यांनी अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. मंथन, चक्र, कलयुग, सारांश, त्रिकाल आघात, द्रोही, मोहन जोशी हाजिर हो, सरदारी बेगम, कोयला, सोल्जर या हिट चित्रपटांमधील सलीम यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ये जो है जिंदगी, सुबह, भारत एक खोज आणि संविधान या मालिकांमध्ये सलीम यांनी काम केलंय.
Web Title: Bollywood Actors Salim Ghouse Passed Away Due To Heart Attack
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..