esakal | आर्यनपुढे ऐश्वर्याही पडली फिकी: तिच्या नव्या लूकची चर्चा पण...
sakal

बोलून बातमी शोधा

आर्यनपुढे ऐश्वर्याही पडली फिकी: तिच्या नव्या लूकची चर्चा पण...

आर्यनपुढे ऐश्वर्याही पडली फिकी: तिच्या नव्या लूकची चर्चा पण...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन ही जशी तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे तशी ती तिच्या हटकेपणासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणाऱ्या ऐश्वर्याची एक छबी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. आताही ऐश्वर्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र सध्या सोशल मीडियावर बॉलीवूडचा किंग खान आर्यन खानच्या अटकेची चर्चा आहे. ऐश्वर्याचे फोटो व्हायरल झाले आहे. मात्र त्याची म्हणावी अशी कुणी दखल घेतलेली दिसत नाही. चाहत्यांनी ऐश्वर्याच्या नव्या लूकला पसंतीही दिली आहे. 1994 मध्ये मिस वर्ल्ड' होण्याचा मान तिनं मिळवला होता. अजूनही ती चाहत्यांच्या आकर्षणाचा विषय असल्याचे दिसुन आले आहे. जर ऐश्वर्या पुन्हा रँपवर उतरली तर.... हा इव्हेंट पुन्हा एकदा उत्साहात पार पडल्याचे दिसुन आले आहे.

आर्यन खानला काल अटक झाली. तो सध्या एनसीबीच्या कोठडीत आहे. आज त्याच्या प्रकरणावर सुनावणीही होणार आहे. यावेळी अनेकांनी मोठ्य़ा प्रमाणात आर्यनला प्रसिद्धी दिली आहे. त्यामुळे ऐश्वर्याच्या त्या लूककडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे. वास्तविक ऐश्वर्याला कुठल्या वेगळी ओळखीची गरज नाही. तिनं आपल्या क्षमतेवर मोठी लोकप्रियता मिळवली आहे. सध्या तिचे पॅरिसमधील फोटो व्हायरल झाले आहेत. यावेळी ती रॅम्प वॉकवर उतरली होती. त्यावेळी चाहत्यांनी तिचं टाळ्या वाजवून स्वागतही केलं. 47 वर्षांच्या ऐश्वर्यानं पॅरिस फॅशन वीकमध्ये भाग घेतला होता त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्याला पसंतीही मिळत आहे. मात्र अनेकांनी ऐश्वर्याला आर्यनच्या तुलनेत कमी पसंती दिल्याचे दिसून आले आहे.

ऐश्वर्या ही 2021 च्या पॅरिस च्या रँप वॉकवर उतरली. त्यावेळी तिथं तिला पाहून अनेकांना सुखद धक्का बसला. अनेकांनी आनंदही व्यक्त केला. व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसते आहे. ऐश्वर्याच्या त्या लूकला केवळ चाहत्यांनीच नाहीतर काही सेलिब्रेटींनी देखील पसंत केले आहे. त्यामुळे तिच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. त्या रँप वॉकमध्ये ती अभिनेत्री ब्रिटीश स्टार हेलेन मिरेनच्या सोबत चालताना दिसून आली. त्या रँपवॉकमध्ये कॅथरीन लँगफोर्ड, एम्बर हर्ड, गेम ऑफ थ्रोन्स फेम निकोलाज कोस्टर वाल्डोही दिसली. या सर्व अभिनेंत्रींना उपस्थितांची मोठी दाद मिळाल्याचे दिसुन आले.

हेही वाचा: Drugs case: आर्यन खानच्या सेल्फीमधील 'तो' मिस्ट्री मॅन कोण?

हेही वाचा: "मुलगा कुणाचाही असो..."; आर्यन खान प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रीया

loading image
go to top