'माईक टायसन'सोबत काय करतेय अनन्या?, फोटो Viral... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'माईक टायसन'सोबत काय करतेय अनन्या?, फोटो Viral...
'माईक टायसन'सोबत काय करतेय अनन्या?, फोटो Viral...

'माईक टायसन'सोबत काय करतेय अनन्या?, फोटो Viral...

sakal_logo
By
टीम इ सकाळ

मुंबई - बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खानच्या प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांडेंच नाव आलं होतं. तिचं आणि आर्यन खानचं ड्रग्ज घेण्याविषयी चॅट व्हायरल झाले होते. त्यामुळे तिला एनसीबीनं चौकशीसाठी देखील बोलावलं होतं. यासगळ्या प्रकरणात अनन्या चर्चेत आली होती. याप्रकरणामुळे बॉलीवूडमध्ये अनेकांना धक्का बसला होता. आर्यनच्या प्रकरणात अनन्याचं नाव आल्यानं त्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. आता अनन्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे. तो फोटो तिनं जगप्रसिध्द बॉक्सर माईक टायसनसोबत शेयर केला असून त्यावर अनेकांनी तिला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अभिनेत्री अनन्या पांडे ही सध्या तिच्या एका चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. पॅन इंडियाच्या चित्रिकरणामध्ये ती व्यस्त आहे. यावेळी तिनं हॉलीवूडचा स्टार माईक टायसन सोबत फोटो शेयर केला आहे त्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. त्याला फोटोला चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. त्याला त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. तिनं इंस्टावर तो फोटो शेयर करुन त्याला गंमतीशीर कॅप्शनही दिली आहे. त्या फोटोमध्ये ती ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप आणि ब्ल्यु जीन्समध्ये दिसत आहे. दुसरीकडे माईक टायसननं तिच्या कानाजवळ जात जोरात ओरडताना दिसत आहे. त्या फोटोला चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट केल्या आहेत. कॅप्शनमध्ये ती म्हणते, आम्ही एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. त्या फोटोला आतापर्यत तीन लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत.

हेही वाचा: कोण आहेत 'पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ?; विक्रम गोखलेंच्या भाषणात उल्लेख

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

पॅन इंडियामध्ये तिच्यासोबत विजय देवरकोंडा एका बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यात माईक टाय़सनही दिसणार आहे. त्यांच्याशिवाय राम्या कृष्णन, रोनित रॉय, विशु रेड्डी आदी कलाकार दिसणार आहेत. पॅन इंडियाची निर्मिती करण जोहर करणार आहे. त्याच्या धर्मा प्रॉडक्शनच्यावतीनं या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. त्याचे दिग्दर्शन जगन्नाथ पुरी यांनी केलं आहे.

loading image
go to top