के. एल. राहुलसोबतच्या नात्याबाबत अथिया म्हणते…

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 November 2019

अथिया शेट्टी व क्रिकेटर के. एल. राहुल या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र या साऱ्यावर अथिया शेट्टीने मौन सोडलं असून तिची प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : टीम इंडियाचा सलामीवीर असणारा के एल राहुल सध्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपासून राहुलचं नाव अभिनेता सुनील शेट्टीच्या मुलीशी म्हणजेच जोडलं जात आहे. अथिया शेट्टीशी जाेडले जात आहे. यावरूनच आता अथियाने प्रतिक्रीया दिली आहे. 

तसं पाहता क्रिकेटर आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्या रिलेशनची चर्चा नवी नाही. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लगीनगाठ बांधली. तर युवराज सिंहनेही हेजल कीचसोबत, झहीर खानने सागरिका घाटगेसोबत विवाह केला. या जोड्या कायमच चर्चेमध्ये असतात. त्यातच आता अथिया शेट्टी व क्रिकेटर के. एल. राहुल या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र या साऱ्यावर अथिया शेट्टीने मौन सोडलं असून तिची प्रतिक्रिया दिली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

...n i’m so good with that 

A post shared by Kanch (@akansharanjankapoor) on

काही दिवसापूर्वी अथियाने के.एल.राहुलसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोनंतर अनेक चर्चांना उधाण आलं. फोटोमधील या दोघांची जवळीकता पाहता हे दोघंही प्रेमात असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच नेटकऱ्यांनी या दोघांना काही प्रश्न विचारले. त्यातच दोघांच्या अफेअरच्या बातम्यांमुळे तुझ्यावर काही परिणाम होतो का असा प्रश्न अथियाला विचारण्यात आला. त्यावर तिनेही थेटपणे उत्तर दिलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

lil mama bad like Michael

A post shared by Kanch (@akansharanjankapoor) on

“मला माझं खासगी आयुष्य सार्वजनिक करायला मला कधीच आवडत नाही. मला माझं खासगी आयुष्य जपायला आवडतं. त्यामुळेच मला माध्यमांसमोर काही गोष्टी सांगायला आवडत नाही. त्यामुळे मी आजही याविषयावर काही बोलणार नाही”, असं अथिया म्हणाली.

दरम्यान, अथियाने २०१५ बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने ‘हीरो’ चित्रपटात पहिल्यांदा काम केलं. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी झाला असून ती ‘मुबारक’ चित्रपटातही दिसली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood actress athiya shetty gave this answer on relationship with cricketer kl rahul