फोटोत दिसणारी ही क्यूट चिमुरडी आज आहे बॉलीवूडची ब्यूटी क्वीन..आईपासून भावापर्यंत सगळेच सिनेमावाले | Bollywood Actress Childhood Photo | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood Actress Childhood Photo

Bollywood Actress: फोटोत दिसणारी ही क्यूट चिमुरडी आज आहे बॉलीवूडची ब्यूटी क्वीन..आईपासून भावापर्यंत सगळेच सिनेमावाले

Bollywood Actress Childhood Photo: आम्ही लिहून देतो फोटोतील या मुलीला ओळखणं तुम्हाला कठीणच गेलं असेल. ही मुलगी आता मोठी झाली आहे आणि बॉलीवूडच्या चर्चेतील अभिनेत्रींपैकी एक आहे.

ही एक स्टार किड आहे,जिचा जन्म सिनेइंडस्ट्रीतील एका मोठ्या कुटुंबात झाला आहे आणि अशाच एका स्टार्सनी भरलेल्या घरात ती लहानाची मोठी झाली आहे. लहानपणापासून तिनं आईला पडद्यावर अभिनय करताना पाहिलं आहे.

चला जाणून घेऊया ही क्यूट मुलगी नक्की आहे कोण?(Bollywood Actress Childhood Photo,do you recognize?)

कितीही डोकं चालवलंत तरी या चिमुरडीच्या फोटोंना पाहून ती बॉलीवूडची कोणती अभिनेत्री आहे हे ओळखणं तसं कठीणच जाईल. ही बॉलीवूडच्या नव्या जनरेशनची अभिनेत्री आहे जिने स्टार किड म्हणून नाही तर आपल्या टॅलेंटच्या बळावर आपला असा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

ही दुसरी-तिसरी कोणी नसून आपली जान्हवी कपूर आहे बरं का. नुकतात ६ मार्च रोजी तिनं आपला २६ वा वाढदिवस सेलिब्रेट केला.

हेही वाचा: परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

जान्हवीनं ६ वर्ष आधी २०१८ मध्ये 'धडक' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात तिच्यासोबत ईशान खट्टर देखील लीड रोल मध्ये होता.

जान्हवी कपूरने ६ वर्षात खूप वेगवेगळ्या व्यक्तीरेखा सिनेमाच्या माध्यमातून साकारल्या. ज्यामध्ये तिनं 'रूही','गूड लक जेरी','मिली','गुंजन सक्सेना' सारख्या खूप दमदार कथानक असलेल्या सिनेमांतून काम केलं आहे.

जान्हवी कपूर बॉलीवूड नंतर आता साऊथ सिने-इंडस्ट्रीत एन्ट्री करत आहे आणि लवकरच 'NTR30' चा भाग असेल.