होय मी मुस्लिम आणि कोणीही मला...गोहर खान भडकली| Bollywood actress gauhar khan angry reaction on Hindu Muslim law comment | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Gauhar Khan
होय मी मुस्लिम आणि कोणीही मला...गोहर खान भडकली

होय मी मुस्लिम आणि कोणीही मला...गोहर खान भडकली

Gauhar Khan : गोहर खान ही अभिनेत्री अशांपैकी एक आहे की, (bollywood actress gauhar khan) तिला सगळेजण तिच्या परखड स्वभावासाठी ओळखतात. वेगवेगळ्या विषयांवर प्रतिक्रिया देण्यासाठी देखील ती प्रसिद्ध आहे. तिला ट्रोल (Social media trolled) करणाऱ्यांना तिनं परखडपणे सुनावले आहे. गेल्या काही दिवसांपासून गोहर खानला वेगवेगळ्या कारणांवरुन ट्रोल केले गेले आहे. तिला तिच्या धर्मावरुनही नेटकऱ्यांनी चिडखोर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे आता संतापलेल्या गोहरनं त्यांची शाळा घेतली आहे. तिनं हिंदू - मुस्लिम (Hindu Muslim Law) कायद्याबाबत रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत आली आहे.

सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक बाबींवरही यापूर्वी गोहरनं (Gauhar Khan angry) बिनधास्तपणे प्रतिक्रिया दिली आहे. ज्यावेळी तिला नेटकऱ्यांनी या मुद्द्यांवरुन ट्रोल केले त्यांना तिनं जशास तसे उत्तरंही दिलं आहे. त्याचं झालं असं की, एका सोशल मीडिया युझर्सनं सिव्हिल कोर्टामध्ये खटला लढताना मुस्लिम आणि हिंदू समुदायाला उद्देशुन एक प्रतिक्रिया दिली. ते पाहिल्यावर गोहर खान कमालीची भडकली आहे. त्या व्यक्तीनं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, अजूनही बाहेरचे लोक जाणून घ्यायला तयार नाहीत की वास्तविक परिस्थिती काय आहे ते, भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्याविषयी आपल्याकडे दोन वेगवेगळ्या स्वरुपाचे कायदे आहेत.

हेही वाचा: Movie Review: नादखुळा 'पुष्पा'!, कडक समंथा, भडक अल्लु अर्जुन

हिंदूना काही नियमांचे पालन करावे लागते. तसेच ते मुस्लिमांना देखील करावे लागते. मात्र त्यांच्यात चार लग्न होतात. आणि शरियत नावाच्या कायद्यानुसार पत्नी आणि मुलींवर काही जाचक अटींना सामोरं जावं लागतं. हे आपण लक्षात घ्यायला तयार नाही. सिव्हिल कोर्टामध्ये सगळ्यांना एक सारखे नियम लागू करायला हवेत. असं वाटतं. त्या व्यक्तीनं अशाप्रकारचे व्टिट केले आहे. त्यावर भडकलेल्या गोहरनं म्हटलं आहे की, मी एक मुसलमान आहे. आणि कुणीही आम्हाला आमच्या अधिकारांपासून वंचित करु शकत नाही. भारत हा धर्मनिरपेक्ष आहे. हे लोकतंत्र असणारं राष्ट्र आहे. त्यामुळे आपण जर अमेरिकेत राहत असाल तर व्यवस्थित राहा. माझ्या देशात नाराजी पसवण्याचे काम काही करु नका. या भाषेत गोहरनं उत्तर दिलं आहे.

हेही वाचा: Jio, Airtel आणि Vi चे 3GB डेली डेटा प्लॅन, मिळेल फ्री कॉलिंगसह बरंच

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top