अभिनेत्री काजलची 'Good News' नेटकऱ्यांनी केला कौतूकाचा वर्षाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kajal aggarawal
अभिनेत्री काजलची 'Good News' नेटकऱ्यांनी केला कौतूकाचा वर्षाव

अभिनेत्री काजलची 'Good News' नेटकऱ्यांनी केला कौतूकाचा वर्षाव

नव्या वर्षाची सुरुवात बॉलीवूड सेलिब्रेटींनी (bollywood celebrity) वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन करुन केल्याची दिसत आहे. यामध्ये अनेक अभिनेते, अभिनेत्री यांनी परदेशात जाऊन त्याठिकाणी केलेल्या भ्रमंतीचे फोटो शेयर केले आहेत. यासगळ्यात अभिनेत्री काजल अग्रवालचे (bollywood actress kajal aggarawal) फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. साऊथ आणि बॉलीवूडमधील चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या काजलची गुड न्यूज असल्याचं तिच्या पतीनं गौतम किचलुनं (husband gautam kichlu) सांगितलं आहे. त्यानंच तिचे फोटो शेयर करुन चाहत्यांना त्याविषयी सांगितलं आहे.

काजल लवकरच आई (kajal good news) होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या गॉसिपिंग सुरु होत्या. अखेर त्यावर गौतमनं सोशल मीडियावर शेयर केलेल्या फोटोंवरुन नेटकऱ्यांनी आता काजलवर कौतूकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केला आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला काजलनं दिलेल्या या बातमीनं चाहते सुखावले आहेत. त्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री काजलचा पती गौतमनं इंस्टावर शेयर केलेल्या (gautam share photo) त्या फोटोला एक कॅप्शन दिली आहे. त्यात त्यानं 2022 आता आम्ही तुझी वाट पाहत आहोत असं लिहिलं आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी तिच्या गुड न्युजचा अंदाज बांधला आहे.

हेही वाचा: यंदाच्या वर्षी या बॉलीवूड (Bollywood) सेलिब्रेटींच्या घरात हलला पाळणा...

यासोबत गौतमनं प्रेग्नंट महिला अशा अर्थाचा एक इमोजी देखील वापरला आहे. त्या फोटोमध्ये काजल कमालीची सुंदर दिसते आहे. यापूर्वी काजलनं पतीसोबत एक फोटो शेयर केला होता. त्यावेळी तिनं आपले बेबी फ्लाँटचे फोटो चाहत्यांना शेयर केले होते. त्यालाही नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. काजलनं ते फोटो शेयर करताना लिहिलं होतं की, मी आता नवीन सुरुवात करते आहे. पुन्हा नवी सुरुवात, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा... 2020 च्या ऑक्टोबरमध्ये काजल आणि गौतमचं मुंबईमध्ये लग्न झालं होतं. कोरोनाच्या काळात काही निवडक नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केलं होतं.

हेही वाचा: 83 Movie Review: अविस्मरणीय विजयाची यशोगाथा

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top