Kangana: अभिनेत्यांचे चेहरे उकडलेल्या अंड्यांसारखे! बॉलीवूडवर आगपाखड|Bollywood Actress Kangana Ranaut comment celebrity | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress kangana ranaut

Kangana: अभिनेत्यांचे चेहरे उकडलेल्या अंड्यांसारखे! बॉलीवूडचे टोचले कान

Bollywood Actress: बॉलीवूडची क्वीन कंगना ही नेहमीच तिच्या वादग्रस्त (Kangana Ranaut) वक्तव्यासाठी ओळखली जाते. सध्या तिच्या धाकड चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे. त्याच्या ट्रेलरला आणि कंगनाच्या लूकला प्रेक्षकांचा (Bollywood News) प्रतिसाद मिळाला आहे. कंगनाचा खास प्रेक्षकवर्ग आहे. भलेही ती कुणावरही का बोलेना पण तिच्या चित्रपटांना गर्दी करणारा प्रेक्षकवर्ग तिनं यानिमित्तानं जोडला आहे. आता तिनं बॉलीवूडचा सिंघम अजय देवगण आणि खिलाडी अक्षय कुमार यांच्यावर सडकून टीका केली. त्यांच्या दिसण्यावर कंगनान हल्लाबोल करत त्यांना चक्क उकडल्या अंड्याची उपमा दिली आहे. कंगना असं का म्हटली हे आपण जाणून घेणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा वाद सुरु आहे. त्यातही कंगनानं उडी घेतल्याचे दिसुन आले आहे.

कंगनानं सोशल मीडियावर जी पोस्ट शेय़र केली आहे त्यामध्य़े तिनं दाक्षिणात्य चित्रपटांचं कौतुक केलं आहे. दाक्षिणात्य़ चित्रपट प्रेक्षकांना आवडतात याचं खास कारण आहे. ते आपण जाणून घ्यायला हवं. प्रेक्षकांना त्यांच्या स्क्रिप्ट आवडतात. त्यातील वेग, संवाद, प्रसंग, भारावून टाकणारी पात्र यामुळे पडद्यावर हे चित्रपट पाहतनाचा आनंद काही वेगळा असतो. यावेळी कंगनानं बॉलीवूडवर टीका केली आहे. कंगना म्हणते, प्रेक्षक ज्याअर्थी दाक्षिणात्य चित्रपटांशी चटकन जोडले जातात त्याअर्थी ते त्यांच्या मातीतील गोष्टी प्रभावीपणे साकारतात. ते त्यांच्या गेल्या काही कलाकृतींवर दिसून आले आहे. आपल्याकडे तसे होताना दिसत नाही. त्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड होतो.

हेही वाचा: Bollywood V/S South : तुला साऊथचे चित्रपट आवडतात का? रणवीर सिंगचं कडक उत्तर

बॉलीवूडचे अभिनेते हे कायम परदेशातील संस्कृती आपल्या चित्रपटांतून दाखवतात. त्यांची मुले देखील इंग्रजी बोलणं, त्यानुसार चित्रपटांमध्य़े वावरणं याचा परिणाम बॉलीवूडवर होतो आहे. प्रेक्षकांना हे पाहायला आवडत नाही. त्यांना आपल्या मातीतल्या संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या गोष्टी पाहायला आवडते. तुम्ही जर त्यांना ते दिले नाही तर त्यांना त्या गोष्टी ज्या चित्रपटात दिसतात तो चित्रपट त्यांना आवडल्याशिवाय राहणार नाही. मोठमोठ्या अभिनेत्यांची मुलं परदेशात शिकाय़ला जातात. इंग्रजी बोलतात. आणि ती जेव्हा बॉलीवूडमध्ये काम करतात तेव्हा त्यांचे चेहरे हे उकडलेल्या अंड्यासारखे दिसतात. अशी टी कंगनानं केली आहे.

हेही वाचा: Bollywood Top 10 : अमिताभ, शाहरुख, सलमान कोणीच नाही! आहे तरी कोण?

Web Title: Bollywood Actress Kangana Ranaut Comment Celebrity Kid Tollywood Box Office Hit

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top