बॉलीवूडच्या महानायकावर कंगनाची आगपाखड, 'धाकड' वरुन सोडलं टीकास्त्र...|Bollywood Actress Kangana Ranaut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood Actress Kangana Ranaut

बॉलीवूडच्या महानायकावर कंगनाची आगपाखड, 'धाकड' वरुन सोडलं टीकास्त्र...

Bollywood Movie: बॉलीवूडमध्ये आपल्या परखड वक्तव्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रनौत. तिनं आता थेट बॉलीवूडचे महानायक (Amitabh Bachchan) अमिताभ बच्चन यांच्यावर टीका केली आहे. कंगनाचा धाकड नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्याला नेहमीप्रमाणे (Dhakad Movie) प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाही मिळाल्या आहे. कंगनाला बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनी त्यावर काही बोलावं अशी अपेक्षा होती. मात्र झाले उलटेच.

कंगनाच्या धाकड नावाच्या चित्रपटाची चर्चा आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आपल्या विरोधात किंवा टीका करणाऱ्याला जशास तसं उत्तर देण्यासाठी कंगना ओळखली जाते. तिनं यापूर्वी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींशी पंगा घेतला आहे. त्यामुळे कंगनाच्या विरोधात बोलताना अनेकजण विचार करतात. आता तर कंगनान बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावरच टीका केली आहे.

हेही वाचा: 'मास्टरशेफ' अर्जुन तेंडुलकरचे वडिलांच्या पावलावर पाऊल! - Video Viral

कंगनाच्या धाकडमधील पहिलं गाणं शी इज ऑन फायर रिलिज झालं आहे. त्याला नेटकऱ्यांचा प्रतिसादही मिळाला आहे. धाकडच्या टीझरवर अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली होती. मात्र काही वेळानं त्यांनी ती डिलिट केली. त्यावर संतापलेल्या कंगनानं बच्चन यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही

मला माहिती आहे की, माझ्या त्या चित्रपटाच्या गाण्यावर मोकळेपणानं कुणी व्यक्त होणार नाही. याचे कारण जे व्यक्त झाले आहेत त्यांना वाटणारी असुरक्षितता. ते नेहमी हे कारण सांगुन लपण्याचा आणि आपल्या जबाबदारीपासून पळण्याचा प्रयत्न करताना दिसून आले आहे. आता मला तर बॉलीवूड इंडस्ट्रीमधून बॉयकॉट केलं जातं की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. असं कंगनानं म्हटलं आहे.

Web Title: Bollywood Actress Kangana Ranaut Comment On Big B Amitabh Bachchan Dhakad Movie Teaser

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top