देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा झाला अपमान, 'कंगनाचं नागरिकत्व रद्द करा'... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा अपमान, 'कंगनाचं नागरिकत्व रद्द करा'...
देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा झाला अपमान, 'कंगनाचं नागरिकत्व रद्द करा'...

देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा अपमान, 'कंगनाचं नागरिकत्व रद्द करा'...

sakal_logo
By
टीम इ सकाळ

मुंबई - बॉलीवूडची वादग्रस्त अभिनेत्री कंगना ही नेहमीच तिच्या वादामुळे चर्चेत येते. त्यामुळे तिच्यावर वेगवेगळ्या क्षेत्रातून टीकाही होते. यावेळी देखील तिनं देशाच्या स्वातंत्र्याच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे भीक असून देशाला स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाल्याची प्रतिक्रिया कंगनानं दिली होती. त्यावरुन सोशल मीडियावरुन तिच्यावर अनेकांनी कडाडून टीका केल्याचे दिसून आले आहे. त्यात काही राजकीय नेते, सेलिब्रेटींचा समावेश आहे. आता काही संघटनांनी देखील कंगनाच्या विरोधात आक्रमक पाऊल उचलले आहे.

कायम वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत हिने स्वातंत्र्याबद्दल गरळ ओकली आहे. त्यामुळे तिचे नागरिकत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय वडार समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. याबद्दलची अधिक माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक शिंदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यासंदर्भात दीपक शिंदे यांनी म्हटले आहे की, भारताच्या स्वातंत्र्यासाठी लाखो भारतीयांनी बलिदान दिले आहे. त्यामध्ये वडार समाजानेही भरीव योगदान दिले आहे. कंगनाने स्वातंत्र्याचा अपमान करून देशद्रोही वक्तव्य केले आहे.

कंगनानं केलेल्या वक्तव्याला मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनी दुजोरा दिला होता. त्यांनी कंगना जे काही बोलली त्यात चूक काय असा प्रश्न विचारला आहे. याशिवाय त्यांनी आपण कंगनाच्या पाठीशी असं वक्तव्य केल्यानं त्यांच्यावरही जोरदार टीका करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगनानं तिच्या बेताल वक्तव्यानं साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे. यामुळे तिच्याविरोधात नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर कडाडून टीका केली आहे. शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी देखील कंगनाला जो पद्मश्री देण्यात आला त्याचे कारण काय, असा प्रश्न विचारला आहे. तिनं तिच्या बॉलीवूडच्या करिअरमध्ये असे काय काम केले की, त्यामुळे तिला या पुरस्कारानं गौरविण्यात आले. अशी टिप्पणी तुमाने यांनी केली आहे.

हेही वाचा: कंगना काय चुकीचं बोलली, माझ्याकडे पुरावे : विक्रम गोखले

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

loading image
go to top