'मी गोरीयं. पण मला माझा रंग आवडत नाही'... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bollywood actress kangana ranaut

'मी गोरीयं, पण मला माझा रंग आवडत नाही'...

मुंबई - अभिनेत्री कंगणा सोशल मीडियावर सर्वात जास्त काळ अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. ती वेगवेगळ्या गोष्टींवर परख़पणे आपली मतं मांडत असते. कंगणाचा एक दिवस काही वेगळी प्रतिक्रिया दिल्याशिवाय जात नाही. ती सतत कुणावर तरी टीका करतच असते. त्यात तिला त्यावरुन कुणी काही बोलल्यास कंगणा त्याला काही खडे बोल सुनावल्याशिवाय शांत बसत नाही. आताही ती चर्चेत आली आहे त्याचे कारण म्हणजे तिनं स्वत;विषयी काही मतं व्यक्त केलयं. यामुळे नेटक-यांनी तिला चांगलेच धारेवर धरले आहे. ती अनेकांच्या टीकेचा विषय झाली आहे. कंगणाचा एक इंटरव्ह्यु व्हायरल झाला आहे. त्यात तिनं तिच्या रंगाविषयी भाष्य केलं आहे.

मी माझ्या रंगामुळे बॉलीवूडमध्ये नाव कमावलं असं नाहीये. त्यासाठी माझ्या मेहनतीकडे कुणी पाहायला मागत नाही. आजकाल बॉलीवूडमध्ये गो-या रंगाला फार भाव आहे. मी माझ्या रंगामुळे काही काळ बॉलीवूडमध्ये राहीले असते. मात्र आपण आपल्या टॅलेंटवर मोठं व्हायचं असं ठरवलं होतं. त्यानुसार मी वाटचाल करायला सुरुवात केली. आणि यशस्वीही झाले. एका मुलाखतीच्या दरम्यानं कंगणानं सांगितलं की, मला माझी वेगळी ओळख तयार केली. त्यासाठी हवे ते कष्ट घेतले. मला इंडस्ट्रीमध्ये काही कमी त्रास झालेला नाही. मात्र हे कुणी लक्षात घ्यायला तयार नाही. माझ्यापुढे जे होते तेच मी केलं असतं तर कदाचित आता ज्याठिकाणी आले आहे तिथे आले नसते.

तुम्हाला माझ्याबद्दल एक गोष्ट सांगितल्यानंतर कदा़चित वाईट वाटेल. ते म्हणजे मी खूप गोरी होते. त्याच्या जोरावर मला बॉलीवूडमध्ये टिकून राहिले असते. मात्र मला माझा गोरा रंग आवडत नव्हता. माझ्या नावडीच्या ज्या गोष्टी आहेत त्यात माझ्या रंगाचाही उल्लेख करावा लागेल. कंगणा पुढे म्हणाली, एक माणून म्हणून माझ्यात अनेक गुण आहेत. आणि त्याची कुणाला काही पडलेली नाही. असं मला वाटायचं. 2013 मध्ये कंगणानं सांगितलं होतं की, लहानपणापासून मला त्या ब्युटी कॉन्टेस्ट मधील गोष्टी कधी समजल्याच नाहीत.

माझी बहीण रंगोली सावळ्या रंगाची आहे. आणि सुंदरही आहे. आता मी जर गो-या रंगाच्या एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यास मलाही ती माझ्या रंगावरुन चिडवेल. अशी भीती वाटते. मी जर माझ्या बहिणीशी खरं बोलू शकत नसेल तर पूर्ण देशाशी कसं बोलणार असा सवाल कंगणानं यावेळी उपस्थित केलायं.

Web Title: Bollywood Actress Kangana Ranaut My Fair Complexion Least Of My

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top