
PM Modi Security Breach: जे झालं ते अतिशय लाजीरवाणं! कंगना बोललीच
मुंबई - प्रसिद्ध अभिनेत्री कंगना (bollywood actress kangana ranaut) ही तिच्या बेताल वक्तव्यासाठी ओळखली जाते. तिला तिच्या वक्तव्यावरुन अनेकदा ट्रोलही (Trolled) केले गेले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिनं देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यावरुन एक वक्तव्य केलं होतं. देशाला जे स्वातंत्र्य मिळालं ते भीक असल्याचं तिनं म्हटलं होतं. यामुळे कंगनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये तिच्यावर गुन्हे दाखल झाले होते. मात्र तरी देखील कंगनानं आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले होते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बाजुनं तिनं दिलेली प्रतिक्रिया.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे (Modi) काल पंजाबच्या (Punjab) दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये काही चूक झाली. त्याचा परिणाम म्हणजे त्यांच्या वाहनाचा ताफा एका पूलावर बराच वेळ अडकून पडला होता. देशभरातील मीडियानं याची दखल घेतली. यामुळे केंद्रीय प्रशासन आणि पंजाब पोलीस प्रशासन यांच्यावर टीका होताना दिसत आहे. यावर अनेक राजकीय व्यक्तींनी प्रतिक्रिया दिली. काल भाजपच्या नेत्या स्मृ़ती इराणी यांनी देखील मोदींच्या विरोधात कट केला जात असल्याचे सांगत मोठा आरोप सत्ताधारी पक्षावर केला होता. त्यानंतर कंगनाची प्रतिक्रिया लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

kangana post
हेही वाचा: यंदाच्या वर्षी या बॉलीवूड (Bollywood) सेलिब्रेटींच्या घरात हलला पाळणा...
कंगनानं आपल्या प्रतिक्रियेमध्ये पंजाबला अतिरेकी कारवायांचा अड्डा असणारं राज्य असं संबोधलं आहे. याविषयी कंगनानं सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये तिनं लिहिलं आहे की, पंजाबमध्ये जे झालं ते अतिशय लाजीरवाणं होतं. त्याला दुसरा शब्द नाही. आदरणीय प्रधानमंत्री लोकशाहीतून निवडून दिले गेलेले आहेत. ते 140 कोटी जनतेचा आवाज आहे. त्यांचे प्रतिनिधी आहेत. मात्र त्यांच्याबाबत झालेला प्रकार हा शोभनीय नाही. तो एकप्रकारे लोकशाहीवर केलेला हल्ला असल्याची प्रतिक्रिया कंगनानं दिली आहे.
हेही वाचा: Salman Khan Birthday: 55 व्या बर्थडे दिवशी खास संदेश देणाऱ्या सल्लूमियाँविषयीच्या खास गोष्टी