'हिमालयातील मादक पदार्थाचं सेवन कंगनानं केलंय' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'हिमालयातील मादक पदार्थाचं सेवन कंगनानं केलंय'
'हिमालयातील मादक पदार्थाचं सेवन कंगनानं केलंय'

'हिमालयातील मादक पदार्थाचं सेवन कंगनानं केलंय'

मुंबई - बॉलीवूडची वाचाळ अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कंगनान काल देशाच्या स्वातंत्र्यावरुन जे वक्तव्य केलं त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटले आहे. कंगनानवर अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी टीका केली आहे. राजकीय नेत्यांनी देखील कंगनाला फटकारले आहे. देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे भीक मागून मिळाले आहे. अशाप्रकारचे वक्तव्य तिनं केलं होतं. एवढयावरच कंगना थांबली नाही तर तिनं महात्मा गांधी यांच्याविषयी देखील अपशब्द वापरले. त्यावरुन तिच्या त्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तिच्या वक्तव्यावर सध्या चर्चेत असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे नेटकऱ्यांनी कंगनाला आणखीच ट्रोल केले आहे.

मलिक यांनी कंगनाच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, कंगनानं आपल्या वक्तव्यामध्ये जे काही म्हटले ते गंभीर आहे. त्यावर तिचा निषेध केला पाहिजे. ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्या त्यागाबद्दल अशाप्रकारे भावना व्यक्त करणे चूकीचं आहे. आणि तिला केंद्र सरकारनं पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. याला काय म्हणावं. तिचा तो पुरस्कार परत काढून घ्या. अशी मागणी मलिक यांनी केली आहे. आणि तिला अटक करा अशी प्रतिक्रिया मलिक यांनी व्यक्त केली आहे. अशाप्रकारचे वक्तव्य करताना कंगनानं मादक पदार्थांचे सेवन केले होते. अशीही टिप्पणी मलिक यांनी केली आहे.

मलिक म्हणाले, कंगना हिमाचल मध्ये राहते. तिथे येणाऱ्या एका वेगळ्या प्रकारचे ड्रग्ज तिनं खाल्लं आहे. त्यामुळे तिनं अशाप्रकारची वक्तव्ये केली आहेत. अशी टिप्पणी मलिक यांनी केली आहे. कंगनानं काल एका कार्यक्रमामध्ये देशाच्या स्वातंत्र्य़ावर भाष्य केले. त्यात ती म्हणाली, देशाला लढून नव्हे तर भीक मागून स्वातंत्र्य मिळाले आहे. आपल्याला खरे स्वातंत्र्य मिळाले ते 2014 मध्ये. कंगनाच्या प्रतिक्रियेला देशभरातून मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले गेले आहे. त्यावरुन तिच्यावर वेगवेगळ्या स्तरातून आरोही करण्यात आले आहे.

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

हेही वाचा: Movie Review; 'नुसतचं भांडण नको, संवादही हवा'; Meenakshi Sundareshwar

loading image
go to top