esakal | बॉलीवूडची क्वीन साकारणार 'सीता मैय्या'
sakal

बोलून बातमी शोधा

बॉलीवूडची क्वीन साकारणार 'सीता मैय्या'

बॉलीवूडची क्वीन साकारणार 'सीता मैय्या'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आता कुठे कंगनाचा थलाईवी नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला नाही तर तिच्या वेगळ्या भूमिकेची चर्चा व्हायला लागली आहे. काही दिवसांपूर्वी रामायणावर एका भव्य कलाकृतीची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा झाली होती. त्यात सीतेच्या भूमिकेत प्रसिद्धी अभिनेत्री करिना कपूर करणार असल्याची चर्चा होती. तिनं त्यासाठी मोठ्या मानधनाची अपेक्षा केली होती. त्यावरुन सोशल मीडियावर मोठ्या चर्चेला सुरुवात झाली होती. आता पुन्हा त्या चित्रपटात सीतेची भूमिका कोण करणार यावरुन चर्चा सुरु झाली आहे. यासगळ्या परिस्थितीत कंगना ही सीतेची भूमिका करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच कंगनाची थलाईवी नावाची फिल्म प्रदर्शित झाली आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दिवंगत राजकारणी जय ललिता यांच्या आयुष्यावरील या चित्रपटामध्ये कंगनानं मुख्य भूमिका साकारली आहे. त्याबरोबर कंगनानं एक नवी घोषणा केली आहे. ती म्हणजे आपण सीतेची भूमिका करणार असल्याचे तिनं सांगितलं आहे. आतापर्यत चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या कंगणानं नेहमीच आपल्या वादग्रस्त स्वभावामुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. बॉलीवूडमधील सध्याच्या घडीला सर्वाधिक वादग्रस्त अभिनेत्री म्हणून कंगणाच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. तिच्यासोबत काम करण्यासाठी कित्येक निर्माते आणि दिग्दर्शक नाराज असतात. त्याला कारण कंगणाचा तिरकस स्वभाव हे आहे.

कंगणानं त्या चित्रपटाच्या पोस्टरचा फोटो आपल्या सोशल मीडियावरुन व्हायरल केला आहे. त्याला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाचे पूर्ण नाव सीता द इनकर्नेशन असे आहे. त्याचे दिग्दर्शन अलौकिक देसाई हे करणार आहे. तर त्याची निर्माती सलोनी शर्मा ही आहे. सीता चित्रपटाचे राइट्स हे एस एस राजामौली यांचे वडिल केवी विजयेंद्र प्रसाद यांचे आहेत. ज्यांनी बाहूबली नावाच्या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली होती. सीता नावाच्या चित्रपटातील गाणी मनोज मुंतशिर यांनी लिहिले आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलूगु आणि मल्याळम, कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा: Video: सेम टू सेम सिद्धार्थ शुक्ला, चाहते झाले भावूक

हेही वाचा: कंगणा राजकारणात प्रवेश करणार ? भाजपच्या नेत्याचे संकेत

loading image
go to top