esakal | 'आली मोठी जगाला ज्ञान शिकवायला,स्वत: मास्क न लावताच फिरते'
sakal

बोलून बातमी शोधा

 bollywood actress kangana ranaut without mask video viral tv actors trolled her

सध्या कंगणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे तिच्यावर नेटक-यांनी टीका केली आहे.

'आली मोठी जगाला ज्ञान शिकवायला,स्वत: मास्क न लावताच फिरते'

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता पुढील दिवस आणखी संकटाचे असणार आहेत याची जाणीव प्रशासनानं लोकांना करुन दिली आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा पर्याय पुन्हा अंमलात आणला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांबरोबरच बॉलीवूडमधील कलाकारांच्या मनात भीती वाढली आहे. यापूर्वी अनेक सेलिब्रेटींना कोरोनानं आपल्या विळख्यात घेतलं आहे. मोठमोठे सेलिब्रेटी कोरोनाची लागण झाल्यानं घरी क्वॉरनटाईन आहेत. यासगळ्यात बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री कंगणा चर्चेत आली आहे ते तिच्या बेशिस्त वागण्यामुळे. कंगणानं असं काही केलं आहे त्यामुळे नेटक-यांनीही तिच्यावर सडकून टीका केली आहे.

सध्या कंगणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे तिच्यावर नेटक-यांनी टीका केली आहे. त्या व्हिडिओमध्ये कंगणाच्या तोंडाला मास्क दिसत नसल्यानं नेटक-यांनी तिला खडे बोल सुनावले आहे. त्याचं काय आहे, कंगणा सोशल मीडियावर सर्वात अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. तिचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. प्रत्येक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडामोंडीवर कंगणा बारकाईनं लक्ष ठेवून असते. दरवेळी विरोधात मत व्यक्त करुन ती मोठ्या प्रमाणावर प्रसिध्दी तर मिळवते याशिवाय लोकांना मार्गदर्शन आणि उपदेश करण्यातही ती नेहमीच आघाडीवर असते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. अशावेळी लोकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य प्रशासन करत आहे. दुसरीकडे कंगणानं त्या नियमांचा भंग केला आहे.

कंगणाच्या त्या व्हिडिओमध्ये ती मास्कविना दिसत आहे. याचा नेटक-यांना राग आला आहे. दरवेळी दुस-यांना शहाणपणा शिकवणारी कंगणा स्वत; नियमांचे पालन का करत नाही असा सवाल यावेळी काही ने़टक-यांनी कंगणाला केला आहे. त्यामुळे ती ट्रोल झाली आहे. तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली आहे. मास्क न घालताच फिरत असल्याचा कंगणाचा व्हिडिओ मुंबईतील एका स्टूडिओ बाहेर दिसून आला. तो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हाय़रल झाला आहे. कंगणाच्या त्या व्हिडिओला अनेक सेलिब्रेटींनीही कमेंट केली आहे. त्यात टीव्ही कलाकार किश्वर मर्चंट आणि तिचा पती सुयश राय यांचाही समावेश आहे.

हेही वाचा : अजय देवगणसोबत अफेअरच्या चर्चांवर अखेर महिमाने सोडलं मौन; म्हणाली..

त्या व्हिडिओवर कमेंट करताना किश्वरनं लिहिलं आहे की, कंगणा मास्क वापरत नाही. आणि तिच्या हातात कधीही मास्क नसते. किश्वरच्या पतीनं लिहिलं आहे, जगाला ज्ञान शिकवण्यात कंगणा सगळ्यात पुढे असते. आणि स्वताच्या बाबतीत मुर्खपणा करत असल्याचे यानिमित्तानं दिसून आले आहे. 

 
 
 

loading image