Qatar Airways Video: कमेंट करण्याची घाई नडली, कंगना तोंडावर पडली!|Bollywood Actress Kangana Trolled | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress kangana ranaut

Qatar Airways Video: कमेंट करण्याची घाई नडली, कंगना तोंडावर पडली!

Kangana Ranaut Reacts On Spoof Video: बॉलीवूडची क्वीन असं स्वताला म्हणवणारी अभिनेत्री कंगनाला पुन्हा एकदा चांगलीच अद्दल घडली आहे. कुठल्याही गोष्टीवर तातडीनं सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये कंगनाचे नाव सर्वात प्रथम घ्यावे लागेल. कंगना नेहमीच सोशल मीडियावर (Entertainment News) देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय यासारख्या वेगवेगळ्या गोष्टींवर आपली भूमिका मांडत असते. यावरुन तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे. मात्र कंगनाला त्याचे काहीही वाईट )Social media viral news वाटत नाही. तिला ट्विटरनं तर बॅन केले आहे, दोन समुहामध्ये धार्मिक संघर्ष निर्माण केल्याप्रकरणी तिच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. कंगनावरील बंदी अद्याप ट्विटरनं उठवलेली नाही.

आताही कंगनानं एक वेगळाच वाद ओढावून घेतला आहे. त्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कंगनानं कतार एअरवेजचे सीइओ अल बेकर यांच्या एका स्पुफ व्हिडिओवर प्रतिक्रिया देऊन त्यांची टिंगल केली आहे. ज्यावेळी तिला खऱ्या (Bollywood Actress Kangana Ranaut) व्हिडिओविषयी कळालं तेव्हा मात्र तिची चांगलीच फजिती झाल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर तातडीनं तिनं तिची पोस्ट डिलिट केली आहे. कंगनाच्या बाबत असा प्रकार यापूर्वी अनेकदा घडला आहे. एखाद्या गोष्टीवर तातडीनं प्रतिक्रिया देणं आणि त्या प्रकारातील सत्यता समोर आल्यावर त्यापासून दूर पळणं ही कंगनाची जुनी सवय आहे. त्यामुळे तिला कित्येकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. कंगनानं आता आपली ती प्रतिक्रिया डिलिट केली आहे.

kangana reaction viral

kangana reaction viral

त्याचे झाले असे की, कंगनानं कतार एअरवेजचे सीइओ यांच्या एका वेगळ्याच व्हिडिओचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर शेयर केला. त्याची सत्यता न पडताळता तिनं त्यावर प्रतिक्रियाही दिली. काहीही न कळणाऱ्या व्यक्तीला गरीब माणसांची कसलीच किंमत वा जाणीव नसते. ती व्यक्ती कायमच दुसऱ्यांना पाण्यात पाहण्याचे काम करते. अशा आशयाची ती प्रतिक्रिया होती. तुमच्यासारखे श्रीमंत लोक हे नेहमीच गरिबांना तुच्छ लेखतात. असेही कंगनानं त्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले होते.

हेही वाचा: Kangana Video: कंगना भर पार्टीत सारखं कुणाला किस करतेय, तो आहे कोण?

कंगनाला जेव्हा तो व्हिडिओ खोटा असल्याचे लक्षात आले तेव्हा तिनं घाईनं आपली प्रतिक्रिया डिलिट केली. मात्र ती व्हायरल झाल्यानं तिच्या कमेंटचे स्क्रिन शॉट देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. सोशल मीडीयावर कंगनाच्या अशा वागण्याचा निषेध करण्यात येत आहे. तिच्यावर अनेकांनी टीकाही केली आहे.

Web Title: Bollywood Actress Kangana Trolled Qatar Airways Ceo Spoof Video Viral Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Entertainment
go to top