विक्कीच्या प्रेमात रंगली कतरिना, सासरी 'रंगबाजी'|Bollywood Actress Katrina kaif Vicky Kaushal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

katrina kaif vicky kaushal

Photo Viral: विक्कीच्या प्रेमात रंगली कतरिना, सासरी 'रंगबाजी'

Bollywood News: चित्रपट आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रेटींनी (Tv Entertainment News) होळी आणि धुळीवंदनाचे फोटो सोशल मीडियावर (Social media news) व्हायरल केले आहे. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफच्या फोटोंना नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. कतरिनाची (Bollywood Actress) लग्नानंतरची ही पहिलीच होळी असल्यानं तिच्यासाठी आजचा दिवस खास आहे.

तिनं शेयर केलेल्या फोटोंना नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या (Vicky Kaushal) प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी कतरिनाचे कौतूक केले आहे. तिला शुभेच्छाही दिल्या आहेत. सध्या त्या व्हायरल झालेल्या फोटोंनी विक्की आणि कतरिनाच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कतरिना आणि विकी कौशलचे लग्न झाले होते. त्यांचे लग्न हे देशभरातील त्यांच्या चाहत्यांसाठी आगळी वेगळी पर्वणी होती.

सोशल मीडियावर कतरिनाचा सासरच्या व्यक्तींसोबत रंग खेळतानाचे फोटो व्हायरल झाले आहे. त्या फोटोंना हजारो लाईक्स आणि कमेंटस् मिळाल्या आहेत. त्या फोटोंमध्ये विकीचे आई वडिल, त्याचा भाऊ सनी कौशल हे दिसत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ही जोडी विवाहबद्ध झाली आहे. फोटोला कतरिनानं कॅप्शन दिली आहे की, हॅप्पी होली.....त्या फोटोंवरुन कतरिनानं होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केल्याचे दिसून आले आहे.