RRR Sholay Viral: छत्रपती शिवाजी महाराजांचा केला जयजयकार!

टॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली (S S Rajamaulil) यांचा आरआरआर हा पुढील आठवड्यात प्रदर्शित होणार आहे.
RRR Movie
RRR Movie esakal

Tollywood News : टॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली (S S Rajamaulil) यांचा आरआरआर (RRR Movie) हा पुढील आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. त्याची (Bollywood News) चर्चा आता सुरु झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून या (Bollywood Movies) चित्रपटाची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. असा हा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणारा आरआरआर लवकच आयमॅक्समध्येही प्रदर्शित होणार आहे. त्याच्या टीझर, ट्रेलरला मोठया प्रमाणावर प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता. दोन क्रांतीकारकाची यशोगाथा आरआरआरमध्ये मांडण्यात आली आहे. त्यामध्ये ज्युनिअर एनटीआर, रामचरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

पॅन इंडिया अंतर्गत आरआरआर हा तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. राजामौली दिग्दर्शित हा चित्रपट त्यांचा आतापर्यतचा सर्वात मोठा महत्वकांक्षी प्रोजेक्ट आहे. त्याची चर्चा गेल्या तीन वर्षांपासून आहे. सध्या या चित्रपटातील एक गाणे व्हायरल झाले आहे. त्यामध्ये भारतातील निवडक राज्ये आणि त्या राज्यांतील क्रांतिकारकांची माहिती देण्यात आली आहे. पंजाब, गुजरात, कोलकात्ता या राज्यांबरोबरच महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख गाण्यात आला आहे. सध्या देशभर त्या गाण्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे.

RRR Movie
'RRR' सिनेमाशी 'भूलभूलैय्या 2' ची टक्कर टळली; नवीन तारीख जाहिर...

ज्युनिअर एनटीआर, रामचरण आणि आलिया भट्टच्या बहारदार परफॉर्मन्सनं नेटकऱ्यांची पसंती मिळवली आहे. आतापर्यत त्या गाण्याला 60 लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. हे गाणं तमिळ, तेलुगू आणि हिंदी भाषांमध्ये देखील व्हायरल झाले आहे. काही नेटकऱ्यांनी त्या गाण्यावरुन प्रांतिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सोशल मीडियावरुन केल्याचे दिसून आले आहे. दोन महान स्वातंत्र्यसैनिकांची गोष्ट या चित्रपटाच्या माध्यमातून राजामौली साकारलं आहे.

RRR Movie
RRR: 'रोल छोटा मानधनाचा आकडा मोठा': अजय-आलियानं घेतले एवढे कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com