'लेकीच्या कामगिरीवर आई खूश, म्हणाली, बाळा मला'...

बॉलीवूडमध्ये मोजक्याच अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांच्या अभिनयाची नेहमीच चर्चा होत असते.
'लेकीच्या कामगिरीवर आई खूश, म्हणाली, बाळा मला'...

मुंबई - बॉलीवूडमध्ये मोजक्याच अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांच्या अभिनयाची नेहमीच चर्चा होत असते. चाकोरीबद्ध वाट सो़डून प्रयोगशीलता जपत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामध्ये अभिनेत्री कोंकणा सेन शर्माचं नाव घ्यावं लागेल. तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठं स्थान निर्माण केलं आहे. ती प्रख्यात महिला दिग्दर्शक अपर्णा सेन यांची मुलगी आहे. त्यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्या मुलीचं कोंकणाचं कौतूक केलं आहे. त्याला कारणही तसचं आहे. सध्या कोंकणाची चर्चा सुरु आहे.

भलेही कोंकणा एवढ्या मोठ्या दिग्दर्शकाची मुलगी असेल मात्र तिनं स्वताच्या अभिनयाच्या जोरावर वेगळे स्थान निर्माण केलं आहे. तिच्या नावाचा केवळ भारतच नाही तर जगभरातील चित्रपट रसिकांमध्ये चाहतावर्ग आहे. सध्याच्या घड़ीला कोंकणा सेन ही बॉलीवूडमधील चर्चेतील अभिनेत्री आहे. काल तिनं आपला 42 वा जन्मदिन साजरा केला. काही महिन्यांपूर्वी कोंकणाचा अजीब दास्तान नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात तिनं आदितीराव हैदरी सोबत एका लघुपटामध्ये काम केले होते. त्या लघुपटामध्ये केलेल्या अभिनयामुळे तिला गौरविण्यात आले आहे. भारती मंडल नावाच्या महिलेची भूमिका तिनं साकारली होती. त्या लघुपटातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ठ आशियाई अभिनेत्री या पुरस्कारानं गौरविण्यात आले आहे. त्यानंतर कोंकणाच्या आईनंही देखील कोंकणाचं कौतूक केलं आहे.

अपर्णा सेन यांनी व्टिट करुन लिहिलं आहे की, आशियाई अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार कोंकणानं मिळवला आहे. मी माझ्या प्रिय आणि प्रतिभाशाली मुलीला खूप साऱ्या शुभेच्छा देते. मला तिच्यावर खूप गर्व असल्याची भावना अपर्णा सेन यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय त्यांनी कोंकणाचं एक पेटिंग देखील यावेळी सोशल मीडियावर शेयर केला आहे.

'लेकीच्या कामगिरीवर आई खूश, म्हणाली, बाळा मला'...
तरुण राहण्यासाठी अनिल कपूर पितो 'सापाचं रक्त'?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com