esakal | चॉकलेट बर्गर खाऊन क्रितीनं वाढवलं 15 किलो वजन
sakal

बोलून बातमी शोधा

mimi trailer

चॉकलेट बर्गर खाऊन क्रितीनं वाढवलं 15 किलो वजन

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आपली भूमिका प्रभावी व्हावी यासाठी कलाकार प्रचंड मेहनत घेताना दिसून येतात. आपल्याला बॉलीवूडमधील (bollywood) असे अनेक कलाकार माहिती आहेत की जे एखाद्या भूमिकेसाठी जीवापाड मेहनत घेताना दिसुन येतात. यात बिग बी अमिताभ बच्चन (amitabh bachchan), आमिर खान (aamir khan), विद्युत जामवाल (vidyut jamwal), आयुषमान खुराणा (ayushman khurana), राजकुमार राव (rajkumar rao), ह्रतिक रोशन, टायगर श्रॉफ अभिनेत्रींची नावं सांगायची झाल्यास, विद्या बालन (vidya balan), राणी मुखर्जी (rani mukherji), दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा यांचे उदाहरण देता येईल. आता यात क्रिती सेननचं नाव घ्यावं लागेल. (bollywood actress kriti sanon film mimi making video release on netflix yst88)

क्रिती सध्या तिच्या आगामी मिमी (mimi) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 13 जुलैला त्याचा ट्रेलर (trailer) प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. एक वेगळ्या प्रकारचा विषय या चित्रपटामध्ये मांडण्यात आला आहे. त्यावर काही वर्षांपूर्वी चूपके चूपके नावाचा चित्रपट आला होता. त्यात सलमान खान, राणी मुखर्जी आणि प्रीति झिंटा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सरोगसी मदर (surrogacy) हा विषय मिमीचा केंद्रस्थानी आहे. त्यासाठी क्रितीनं स्वत; मेहनत घेतल्याचे दिसून आले आहे.

क्रितीनं या चित्रपटासाठी तब्बल 15 किलो वजन वाढवल्याची चर्चा आहे. वेगानं वजन वाढविण्यासाठी तिनं बर्गर आणि चॉकलेट खाल्लं असे सांगण्यात आलं आहे. मिमीमध्ये तिच्या लूकला प्रेक्षकांनी दाद दिली आहे. त्याचे काय आहे की, मेकर्सनं मिमीचा मेकिंग व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यालाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला आहे. क्रिती बरोबर यात मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरही दिसणार आहे.

हेही वाचा: "ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट !' घालतोय धुमाकूळ

हेही वाचा: 'माझा होशील ना'मध्ये नवीन ट्विस्ट; आदित्य देसाई विरुद्ध आदित्य देसाईचा सामना

नेटफ्लिक्सच्यावतीनं हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी यांचीही प्रमुख भूमिका आहे. त्या व्हिडिओच्या सुरुवातीला दिग्दर्शक सांगतात की, मिमीशी कनेक्ट व्हायचं असेल तर 15 किलो वजन वाढवावे लागेल. त्यानंतर सेटवर क्रितीच्या खाण्याचे वेळापत्रकच तयार करण्यात आले. तिच्या आहारावर लक्ष ठेवण्यात आले. हे सगळे त्या व्हिडिओमध्ये दाखविण्यात आले आहे.

loading image