esakal | सरोगेट आईच्या भूमिकेत क्रिती, 'मिमीचा' हटके लूक व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

kriti sanons

सरोगेट आईच्या भूमिकेत क्रिती, 'मिमीचा' हटके लूक व्हायरल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोना काळात मनोरंजन क्षेत्राला मोठ्या समस्येला सामोरं जावं लागलं. सर्वाधिक नुकसान निर्माते आणि दिग्दर्शकांना सोसावं लागलं. अनेक चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर पडले. थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित होण्यावर बंधनं येऊ लागले. त्यामुळे प्रेक्षकांनी ओटीटीचा (ott platform) पर्याय स्वीकारला. सध्याच्या घडीला ओटीटीवर मोठ्या प्रमाणात चित्रपट आणि वेब सीरिज (web serise) प्रदर्शित होत आहेत. त्याला प्रेक्षकांची पसंतीही मिळताना दिसत आहे. अशावेळी येत्या काळात मोठ्या संख्येनं चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. (bollywood actress kriti sanons mimi is releasing on digital platform)

बॉलीवू़डमधील प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनन (kriti senon) ही तिच्या वेगळ्या भूमिकेसाठी ओळखली जाते. अद्याप तिच्या वाट्याला मोठ्या प्रमाणात यश मिळालं नसलं तरी तिचा संघर्ष सुरु आहे. ती आता एका हटक्या विषयावरील चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्याचा विषय सरोगसी असा आहे. त्यात तिनं मुख्य भूमिका साकारली आहे. त्या चित्रपटाचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा चित्रपट देखील डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

क्रितीनं सोशल मीडियावर त्या चित्रपटासंदर्भात एक क्लिप शेयर केली आहे. त्यातून तिनं आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या पोस्टरमधून चित्रपटाचा विषय समोर आला आहे. फोटोला कॅप्शन देताना तिनं लिहिलं आहे की, जुलैमध्ये आपण सर्वजण तो चित्रपट येण्याची अपेक्षा आपण सर्वजण करु शकतो. त्यामुळे चालू महिन्यात क्रिती सेननचा तो चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून क्रितीच्या चाहत्यांना तिच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता आहे.

क्रितीनं सांगितलं होतं की, या महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार की ओटीटी प्लॅटफॉर्मवर याबाबत प्रेक्षकांच्या मनात शंका आहे. त्यावरही क्रितीनं सांगावं असं त्यांनी म्हटलं आहे. तिच्या मिमी या चित्रपटाविषयी सांगायचं झाल्यास तिनं चित्रपटामध्ये एका सरोगेट आईची भूमिका साकारली आहे. एका मुलाखतीच्या दरम्यान तिनं सांगितलं होतं की, मी या चित्रपटामध्ये अशा मुलीची भूमिका केली आहे की, ती नेहमी एक अभिनेत्री होण्याची वाट पाहते. ते तिचं स्वप्न आहे. ती मांडवा गावातील एक प्रसिद्ध डान्सर आहे. मात्र ती जेव्हा एका जोडप्याला भेटते तेव्हा सरोगसीचा निर्णय घेते.

हेही वाचा: भयपटांचा बादशाह हरपला; कुमार रामसे यांचं निधन

हेही वाचा: नसीरुद्दीन शाह यांना डिस्चार्ज; मुलाने पोस्ट केले फोटो

या भूमिकेसाठी क्रितीनं आपल वजनही वाढवलं आहे. मात्र चित्रिकरणानंतर ती पुन्हा पहिल्यासारखी झाली आहे. त्यामुळे चाहत्यांना क्रिती पुन्हा एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

loading image