धक धक गर्ल आहे 'लकी'; डॉ नेने नी केले माधूरीला इम्प्रेस

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 March 2021

 माधूरीच्या एका चाहता फोटोला कमेंट करत म्हणाला,' वा! हा पिझ्झा खूप छान दिसत आहे. श्रीराम तुम्ही एक चांगले कूक आहात. माधूरीजी खूप लकी आहेत. दोघांना खूश पाहून चांगले वाटले. तुम्हाला कोणाची नजर लागू नये.'

बॉलिवूडची अभिनेत्री मधूरी दिक्षीत आणि पती श्रीराम नेने हे सोशल माडियावर नेहमीच सक्रिय असते. श्रीराम त्यांच्या कुकिंग स्किलने नेहमीच माधूरीला ईप्रेस करतात. लॉकडाऊनमध्ये माधूरी आणि श्रीरामने एकमेकांसोबत वेळ घालवला. लॉकडाऊनमधील अ‍ॅक्टीव्हीटी आणि कुकींग स्कील्सचे व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत होते. काही दिवसांपूर्वी श्रीरामने माधूरीसाठी कांदे पोहे तयार केले. त्यानंतर आता माधूरीसाठी श्रीरामने पिझ्झा तयार केला आहे. हा पिझ्झा माधूरीला खाऊ घालतानाचा फोटो नुकताच श्रीरामने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.या फोटोला श्रीरामने 'होममेड पिझ्झा....लवकरच माझ्या युट्युब चॅानलवर.. तुमची आवडती डिश कोणती आहे' असे कॅप्शन दिले.

 माधूरीच्या एका चाहता फोटोला कमेंट करत म्हणाला,' वा! हा पिझ्झा खूप छान दिसत आहे. श्रीराम तुम्ही एक चांगले कूक आहात. माधूरीजी खूप लकी आहेत. दोघांना खूश पाहून चांगले वाटले. तुम्हाला कोणाची नजर लागू नये.'

जगावेगळ्या प्रेमाची अनोखी कहाणी; 'सात वर्षे झाली कशी कळलंच नाही'

माधूरी आणि श्रीरामचे लग्न 17 ऑक्टोबर 1999 रोजी झाले. त्यानंतर त्यांना अरिन आणि रयान ही दोन मुले झाली. लग्नानंतर माधूरी आपल्या कुटुंबासोबतचे फोटो अणि व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.माधूरीचे युट्युब चॉनल देखील आहे त्यावर ती वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडीओ पोस्ट करत असते. श्रीराम लेलेंचे देखील युट्युब चॉनल आहे. त्या चॉनलवर ते आरोग्य विषयक टिप्स देत असतात. माधूरीने श्रीराम यांच्यासोबत शूट केलेले मोदक, कांदे पोहे, साबुदाणा खिचडी या पदार्थांच्या रेसिपीचे व्हिडीओ शेअर केले आहेत.

 

 हेही वाचा : सोनाली कुलकर्णीच्या भावासोबत संस्कृती बालगुडेचा 'वेडिंग फोटोशूट'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood actress madhuri dixit husband shriram nene pizza fans