esakal | Oops Moment : कपडेच असे होते की मलायकाला काही बोलता येईना
sakal

बोलून बातमी शोधा

Oops Moment : कपडेच असे होते की मलायकाला काही बोलता येईना

Oops Moment : कपडेच असे होते की मलायकाला काही बोलता येईना

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - सध्याच्या घडीला सोशल मीडियावरुन सर्वाधिक चर्चेत असणारी सेलिब्रेटी कोणती तर मलायका अरोराचं (Malaika Arora Oops Moment Photos) नाव त्यात घ्यावं लागेल. भलेही ती चित्रपटात काम न करणारी अभिनेत्री असेल मात्र तिचा सोशल मीडियावर असणारा चाहतावर्ग मोठा आहे. त्यामुळे ती नेहमी चाहत्यांच्या चर्चेचा विषय असते. आपल्या वेगवेगळ्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेण्यात मलायकाचा हात कुणी धरणारं नाही. फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करुन सर्वाधिक लाईक्स, कमेंट मिळवण्यात ती नेहमीच आघाडीवर असते. पण तुम्हाला माहिती नसेल आपल्या अशाच हटक्या फॅशनमुळे मलायकाला ट्रोल व्हावे लागले होते. त्यामुळे तिला खजीलही व्हावं लागलं होतं. त्याला कारण होतं तिनं घातलेले कपडे.

Oops Moment हा अनेक अभिनेत्रींच्या अंगवळणी पडलेला शब्द आहे. कित्येक पार्टीमध्ये, शो मध्ये किंवा शुटींगच्या वेळी त्यांना या प्रसंगाला सामोरं जावं लागल्याचे दिसून आले आहे. मलायकालाही या प्रसंगाला तोंड द्यावं लागलं होतं. त्यात तिनं परिधान केलेली वेशभूषा इतकी वेगळी होती की, त्यामुळे तिला ट्रोल व्हावं लागलं आणि त्या पार्टीमध्ये होऊ नये ते झालं. याचा फटका म्हणजे मलायकाला खजील व्हावं लागलं होतं. बॉलीवूडमध्ये आपल्या हॉट अंदाजासाठी मलायकाला ओळखलं जातं. काही ठराविक चित्रपटांमध्ये अॅटम साँग केलेली मलायका फार काळ बॉलीवूडमध्ये रमली नाही. ती आता वेगवेगळ्या प्रकारच्या रियॅलिटी शो मध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसते. मलायकानं चाळीशी पार केली असली तरी तिचा फिटनेस आणि तिचे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. ती देखील आपले वेगवेगळे फोटो चाहत्यांसाठी पोस्ट करत असते.

त्याच झालं असं की, 2020 मध्ये मिस दिवा यूनिव्हर्स ग्रँड फिनाले मध्ये रेड कार्पेटवर मलायकानं एक ड्रेस परिधान केला होता. त्या ड्रेसनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यावेळी मलायकानं फ्लोर स्वीपिंग वन शोल्डर रफल्ड गाऊन परिधान केला होता. यलो रंगाच्या या ड्रेसमध्ये मलायका कमालीची सुंदर दिसत होती. मात्र त्याच ड्रेसमुळे तिला Oops Moment ला सामोरं जावं लागलं होतं. याविषयी तिनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं. मलायकानं तो ड्रेस परिधान करुन जेव्हा फोटोसाठी पोझ देण्यास सुरूवात केली तेव्हा मलायकाला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं होतं. तिच्या दृष्टीनं तिला खजील करणारा तो प्रसंग होता. असं तिनं सांगितलं होतं. त्यानंतर काही वेळानं ती ड्रेसिंग रुममध्ये गेली. आणि ड्रेस ठीक करुन पुन्हा शो मध्ये आली होती.

हेही वाचा: मलायका, सईचा 'गोल्डन सिल्व्हर' हॉटलूक

हेही वाचा: 'तू हॉट आहेस', मलायका म्हणाली I Love u राजेश बिकानेरी

loading image
go to top