आर्यन खान प्रकरणावर रवीनाची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली...

आर्यन खान प्रकरणावर रवीनाची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली...

बॉलीवूडचा (bollywood king khan) किंग खान शाहरुखच्या मुलाला आर्यन खानला (aryan khan drug case) ड्रग्ज प्रकरणात एनसीबीनं अटक केली.
Published on

मुंबई - बॉलीवूडचा (bollywood king khan) किंग खान शाहरुखच्या मुलाला आर्यन खानला (aryan khan drug case) ड्रग्ज प्रकरणात एनसीबीनं अटक केली. कोर्टानं त्याला जामीन देण्यास नकार दिला असून त्याच्या कोठडीत आणखी वाढ करण्यात आली आहे. आर्यनच्या बाजूनं त्याच्या वकिलांनी त्याला जामीन कसा मिळेल यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं युक्तिवाद केला. मात्र न्यायालयानं पुढील तपासासाठी कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. दरम्यानच्या काळात बॉलीवूडमधून वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी शाहरुखच्या बाजूनं प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. काहींनी त्याला आपला पाठींबाही दर्शवला आहे. यासगळ्या प्रकरणात अभिनेत्री रवीनानं (actress raveena tondon) देखील उडी घेतली आहे. तिनं याप्रकरणी दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेत आली आहे.

बॉलीवूड स्टार ऋतिक रोशन त्याची पत्नी सुझैन, सलमान खान, सुनील शेट्टी, हंसल मेहता, पूजा भट्ट, फराह खान यांनी उघडपणे किंग खानला सपोर्ट केला आहे. यासगळ्यात रवीनानं आर्यन प्रकरणावर दिलेली प्रतिक्रिया फारच परखड आहे. तिनं आर्यनच्या भविष्यासोबत खेळण्याचा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचं तिनं म्हटलं आहे. रवीनाचं ते व्टिट व्हायरल झाले आहे. त्यावरुन तिला ट्रोलही करण्यात आले आहे. रवीना लिहिते की, हे सगळं लाजीरवाणे आहे. लाजीरवाण्या राजकारणानं आर्यनला त्रासाला सामोरं जावं लागत आहे. तिच्या या प्रतिक्रियेनं वेगळ्या चर्चेला तोंड फोडले आहे. संबंधित प्रशासन त्या युवकाचं आयुष्य उद्धवस्त केल्याशिवाय राहणार नाही. ते त्याच्या भविष्यासोबत खेळत आहे. तिच्या त्या व्टिटला नेटकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.

यापूर्वी ऋतिक रोशननं आर्यनला सपोर्ट करताना लिहिलं होतं की, आर्यन आयुष्य हे फार वेगवेगळ्या वळणांचा प्रवास आहे. त्यात काहीही निश्चित नाही. मात्र आपण त्या परिस्थितींचा सामना कसा करतो हे जास्त महत्वाचे आहे. हे मला सांगायचं आहे. देव हा दयाळु आहे. संकटांचा खंबीरपणे सामना करणाऱ्यांच्या तो पाठीशी असतो. त्यामुळे तु न डगमगता त्या संकटांचा सामना कर. ऋतिकनं आर्यनला दिलेल्या सल्ल्याचीही चर्चा होते आहे. त्यामध्ये त्यानं मोठ्या विस्तृतपणे आर्यनला मानसिक आधार दिला आहे. संकटाच्या काळात धैर्य आपल्या कामी येते. अशावेळी आपण कशाची निवड करायची हे आपल्याला कळायला हवे.

बॉलीवूडचा अभिनेता सुनील शेट्टीने देखील आर्यनच्या बाजूनं प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी त्याला चाहत्यांनी सपोर्ट केला. दुसरीकडे नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. आता रवीनानं दिलेल्या प्रतिक्रियेमुळे नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरले आहे. अभिनेत्री पूजा भट्टला या प्रकरणात ज्या व्यक्तीनं एनसीबीला माहिती दिली त्याच्याविषयी पोस्ट करणं महागात पडलं आहे. अशाप्रकारे आतापर्यत या प्रकरणानं वेगवेगळ्या प्रकारे वळण घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान किंग खान शाहरुखकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

आर्यन खान प्रकरणावर रवीनाची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली...
NCB ला टीप देणाऱ्याची माहिती केली उघड; पूजा भट्ट गोत्यात
आर्यन खान प्रकरणावर रवीनाची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली...
'इतका गर्व कसला?'; शाहरुख-आर्यन खानच्या व्हिडीओवर भडकले नेटकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com