Yashoda: समंथाचा 'यशोदा' लांबणीवर! बॉलीवूडचे मोठे अभिनेते कारणीभूत?| Samantha Yashoda movie postponed | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Samantha news

Yashoda: समंथाचा 'यशोदा' लांबणीवर! बॉलीवूडचे मोठे अभिनेते कारणीभूत?

Tv Entertainment News: अल्पावधीतच ज्या अभिनेत्रीनं आपल्या अभिनयानं वेगळी ओळख निर्माण केली त्या समंथाचा बॉलीवूडमध्ये चाहतावर्गही मोठा आहे. मनोज वाजपेयीच्या द फॅमिली मॅनमधून तिनं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यावरुनच तिचा आणि नागा (Naga Chaitanya) चैतन्य यांच्यात वाद सुरु झाल्याच्या चर्चाही व्हायरल झाल्या होत्या. अखेर त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. चाहत्यांना जेव्हा समंथाच्या या निर्णयाविषयी कळले तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला होता. (Bollywood News Viral) आत समंथाच्या बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. तिच्या आगामी एका चित्रपटाचे प्रदर्शनच पुढे ढकलण्यात आले आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये समंथा आता मोठी सेलिब्रेटी झाली आहे. गेल्या वर्षी तिनं अल्लु अर्जुनच्या पुष्पामध्ये एक आयटम साँग केलं होतं. त्या आयटम साँगला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आगामी काळात समंथाचा यशोदा (samantha news) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेमकं याचवेळी अक्षय कुमार आणि आमीर खानचे चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. यामुळे समंथाच्या यशोदाला मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. समंथाचा यशोदा हा चित्रपट 12 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र आता तिला वेगळीच चिंता सतावत आहे. ती काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

हेही वाचा: Video: आपल्याला दोन्ही हातच नसेल तर?...

समंथाच्या यशोदाच्या वेळीच सलमान आणि अक्षयचे चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. दरम्यानच्या काळात अक्षयचा रक्षाबंधन हा 12 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे आमीर आणि करिना कपूरचा लाल सिंग चढ्ढा रोजी पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे आता यशोदाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

हेही वाचा: Viral Photo: हॉस्पिटलमध्ये सोनमच्या कुशीत चिमुकलं बाळ, अभिनेत्री आई बनली?

Web Title: Bollywood Actress Samantha Yashoda Movie Postponed Aamir Khan Akshay Kumar Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..