
'माझ्या नादी लागलात तर बघा!' साराचा राग अनावर
Bollywood Actress: बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान ही नेहमीच तिच्या हटके (Sara Ali Khan) स्टाईलसाठी ओळखली जाते. आता ती एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे तिला राग अनावर झाला आहे. काही फोटोग्राफर्सनं तिला जे प्रश्न विचारले त्यावरुन साराला राग आला. त्यामुळे तिनं (Bollywood News) नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी देखील काही सेलिब्रेटींना पापाराझीच्या त्रासाला सामोरं जावं लागल्याचे दिसून आले आहे. सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करिनाला या गोष्टींचा वाईट अनुभव आला आहे. त्यांनी देखील सोशल मीडियावरुन याबाबत अनेक मुलाखतींमधून त्याबाबत खंत व्यक्त केली आहे.
साराला यापूर्वी फोटोग्राफर्ससोबत हसताना संवाद साधताना स्पॉट केले गेले आहे. ती फारशी न चिडणारी सेलिब्रेटी म्हणून परिचित आहे. अशावेळी साराचा राग अनावर झाल्याचे कळताच तिच्या चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. साराच्या प्रोजेक्टविषय़ी सांगायचे झाल्यास काही महिन्यांपूर्वी ती आनंद एल राय यांच्या अतरंगी रे मध्ये दिसून आली होती. त्यात तिनं धनुषसोबत मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका साकारली होती. त्यात तिच्या भूमिकेचं कौतूकही झालं होतं. आता तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये तिनं पापाराझींवर आपला राग काढला आहे.त्यांनी तिला विचारला प्रश्न आवडलेला नाही. विरल भयानीनं त्याच्या इंस्टावरुन एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.
हेही वाचा: Photo Story : समुंदरमें नहाके और भी.. भिजलेल्या साराचा हाॅट लूक.. (Sara Ali Khan)
सध्या सारा तिच्या आगामी एका चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. ती जेव्हा त्या शुटिंग स्पॉटवरुन निघाली तेव्हा तिला काही फोटोग्राफर्सनं गाठून फोटो आणि प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्या गडबडीत एका फोटोग्राफर्सची साराला टक्कर लागते. त्यामुळे तिला राग अनावर झाला. सारा गाडीत बसल्यानंतर तिला फोटोग्राफर्सनं फोटो देण्यासाठी विनंती केली. त्यावेळी तिला राग अनावर होतो. आणि ती बोलू लागते. सारा लक्ष्मण उत्तेकर यांच्या अनटायटल्ड नावाच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे.
Web Title: Bollywood Actress Sara Ali Khan Paparazzi Video Photo Viral Social Media Trolled
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..