esakal | 'मी सुद्धा दिव्या भारतीसोबत ड्रग्ज घेतलं होतं, इथे कुणीही संत नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

'मी सुद्धा दिव्या भारतीसोबत ड्रग्ज घेतलं होतं, इथे कुणीही संत नाही'

'मी सुद्धा दिव्या भारतीसोबत ड्रग्ज घेतलं होतं, इथे कुणीही संत नाही'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा भाईजान सलमान खान (bollywood actor salman khan) याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली (somy ali) चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिनं केलेली पोस्ट. तिच्या त्या पोस्टवरुन तिला वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून शाहरखच्या मुलावरुन आर्यन खानचं ड्रग्ज प्रकरण चर्चेत आहे. त्यावरुन बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. आता बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी या प्रकरणात आपल्या प्रतिक्रिया देत शाहरुखला सपोर्ट केलं आहे. त्यात दिग्गज स्टारचा प्रामुख्यानं समावेश आहे. अभिनेत्री सोमा अलीनं आर्यन खानला सपोर्ट करत सध्याची परिस्थिती आणि बॉलीवूडच्या गेल्या काही वर्षांच्या त्यामध्ये आढावा घेतला आहे. ही परिस्थिती बदलेल असे तिला वाटत नाही. सोमी अलीची ती पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.

सलमानची एक्स गर्लफ्रेंड अशी तर सोमी अलीची ओळख आहे. तिनं यापूर्वी वेगवेगळ्या विषयांवर वादग्रस्त पोस्ट शेयर करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सलमानसोबत काही चित्रपटांमध्ये ती दिसली. त्यानंतर ती बॉलीवू़डमधून गायबही झाली. आता ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. आर्यन खानला एनसीबीनं केलेली अटक क्लेशकारक असल्याचं सोमीचं म्हणणं आहे. त्याला आता एनसीबीनं घरी जाऊ द्यायला हवं असं म्हटलं आहे. याविषयावर एक मोठी पोस्ट तिनं इंस्टावर शेयर केली आहे. त्यात तिनं लिहिलं आहे की, मी देखील एकेकाळी दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीसोबत ड्रग्ज घेतलं होतं. कुणीही संत नाही. अशाप्रकारे सोमीनं शाहरुख आणि गौरी यांच्याप्रती सहानुभुती व्यक्त केली आहे.

सोमीनं लिहिलं आहे की, मला वाटतं कित्येक मुलं ही ड्रग्ज ट्राय करतात. तो प्रयोग करुन पाहतात. आता हे थांबणे शक्य आहे का, ड्रग्जची सवय ही वेश्यागमनासारखी असल्याचं मत सोमीनं व्यक्त केलं आहे. ते थांबता थांबत नाही. आपण या गोष्टींचा बारकाईनं विचार करण्याची गरज आहे. मुलांना त्यात फार दोष देण्यात काही अर्थ नाही. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास कोणीही संत नाही. हे लक्षात घ्यायला हवे. मी जेव्हा 15 वर्षांची होते तेव्हा गांजाचं व्यसन केलं होतं. एका चित्रपटाच्या वेळची ती गोष्ट आहे. त्यानंतर अभिनेत्री दिव्या भारतीसोबतही मी ड्रग्ज घेतलं होत. पण मला या गोष्टींचा काही पश्चाताप नसल्याचं सोमीनं सांगितलं आहे. न्यायव्यवस्था ही आर्यनचा उपयोग करुन आपली गोष्ट खरी ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सोमीनं म्हटले आहे.

हेही वाचा: आर्यन खान प्रकरणावर रवीनाची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली...

हेही वाचा: बॉलीवूडची बदनामी केल्याच्या आरोपात शाहरुख-सलमान हायकोर्टात; अमलीपदार्थबाबतीतही बेजबाबदार वार्तांकन केल्याचा दावा

loading image
go to top