Sonakshi Fraud Case: माझी जाणीवपूर्वक बदनामी, काहीही केलेलं नाही|Bollywood Actress Sonakshi Sinha | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonakshi Sinha

Sonakshi Fraud Case: माझी जाणीवपूर्वक बदनामी, काहीही केलेलं नाही

Bollywood News: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं (Sonakshi Sinha) आज आपल्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी सोनाक्षीवर गुन्हा (Entertainment News) दाखल करण्यात येवून तिला कोर्टात हजर करण्याचे आदेश कोर्टानं दिले होते. त्यानंतर सोनाक्षीच्या नावाची (Bollywood Actress) जोरदार चर्चा सुरु झाली होती. यासगळ्या प्रकरणानंतर सोनाक्षीवर नेटकऱ्यांनी सडकून टीका केली आहे. तिला ट्रोलही केले जात आहे. यासगळ्या प्रकरणावर सोनाक्षीनं काय प्रतिक्रिया दिली आहे हे आपण जाणून घेणार आहोत. सोनाक्षी दिल्लीत इव्हेंट करण्याच्या हेतूनं 28 लाख रुपये घेतल्याचे सांगण्यात आले होते. मात्र तो इव्हेंट न झाल्यानं तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याचिकाकर्त्यानं मुराबादमध्ये तक्रार दाखल केली असून कोर्टानं सोनाक्षीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. यावर सोनाक्षीनं प्रतिक्रिया दिली आहे. तिनं हा सगळा प्रकार बनावट असल्याचे म्हटले आहे. आपल्याबद्दल जे काही बोलले जात आहे ते खोटे आहे. आपल्याला फसवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून असे प्रकार सतत होताना दिसत आहे. मात्र मला माझ्या चाहत्यांना सांगायचे आहे की, माझा यात कसलाच संबंध नाही. मीडियमध्ये माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या खोट्या तक्रारी सुरु झाल्या आहेत. .यासगळ्या प्रकरणात काही वेगळ्या माणसांचा सहभाग असल्याचे सोनाक्षीनं सांगितलं आहे.

हेही वाचा: Photo Viral: दिया मिर्झा पहिल्यांदाच दिसली छोट्या 'अव्यान' सोबत

माझ्या लोकप्रियतेला धक्का लावण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे. जो व्यक्ती हे करतो आहे त्याला माझे आवाहन आहे की, त्यानं माझी बदनामी करण्याचे थांबवावे. मी आता त्याच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करणार असून त्यानं आता हे प्रकार थांबवावे अशी मी त्याला विनंती करते आहे. आता मुराबाद कोर्टातील याचिकेवरील प्रकरण प्रलंबित आहे. अलाहाबाद हायकोर्टानं या प्रकरणाला स्थगिती दिली आहे.

हेही वाचा: Viral Video: मलायकाचा 'KISS', कागदावरील मासा झाला जिवंत

Web Title: Bollywood Actress Sonakshi Sinha Non Bailable Warrent Social Media Viral News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top