अभिनयाची राणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

श्रीदेवी यांचे खरे नाव श्री अम्मा यंगर अय्यपन असे होते. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १९६३ला तमिळनाडूमध्ये झाला. त्यांचे वडील वकील होते. श्रीदेवी यांना एक बहीण आणि दोन सावत्र भाऊ होते.  बॉलिवूडमध्ये ‘हवाहवाई’ गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीदेवी यांनी वयाच्या चौथ्या वर्षी ‘ज्युली’ चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. १९७९मध्ये त्यांनी ‘सोलवां सावन’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. हिंदीव्यतिरिक्त त्यांनी तमीळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड या भाषांतील चित्रपटांमध्येही काम केले होते. 

श्रीदेवी यांचे खरे नाव श्री अम्मा यंगर अय्यपन असे होते. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १९६३ला तमिळनाडूमध्ये झाला. त्यांचे वडील वकील होते. श्रीदेवी यांना एक बहीण आणि दोन सावत्र भाऊ होते.  बॉलिवूडमध्ये ‘हवाहवाई’ गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीदेवी यांनी वयाच्या चौथ्या वर्षी ‘ज्युली’ चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. १९७९मध्ये त्यांनी ‘सोलवां सावन’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. हिंदीव्यतिरिक्त त्यांनी तमीळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड या भाषांतील चित्रपटांमध्येही काम केले होते. 

१९८३ मध्ये हिट झालेल्या ‘हिंमतवाला’ या चित्रपटामुळे त्या बॉलिवूडमध्ये स्टार झाल्या. या चित्रपटात जितेंद्र त्यांच्यासोबत मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटानंतर त्यांनी जितेंद्र यांच्यासोबत बऱ्याच चित्रपटांत काम केले. सहजसुंदर अभिनय ही त्यांची खासियत होती. १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सदमा’तील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी प्रथमच फिल्मफेअर ॲवॉर्ड मिळाले. त्या चित्रपटात कमल हसन यांनी त्यांच्यासोबत प्रमुख भूमिका केली होती.

१९८६ मध्ये आलेल्या ‘नगिना’ चित्रपटात त्यांनी इच्छाधारी नागिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली होती. १९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील त्यांची भूमिकाही खूप गाजली होती. त्यातील ‘हवा हवाई...’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे. या चित्रपटानंतरच त्यांना ‘हवाहवाई गर्ल’ संबोधले गेले. या चित्रपटामुळे त्या सुपरस्टार झाल्या. शेखर कपूर यांनी त्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटातील भूमिकेसाठीही श्रीदेवी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचा ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला होता. ‘चालबाज’मधील त्यांच्या दुहेरी भूमिकेचेही कौतुक झाले होते.

‘चालबाज’नंतर त्या ‘यशराज फिल्म्स्‌’च्या ‘चाँदनी’ चित्रपटात ऋषी कपूरसोबत झळकल्या. त्यातील ‘मेरे हाथों में नौ नौ चुडियाँ है...’ हे गाणेही लोकप्रिय आहे. या चित्रपटातील ‘चाँदनी ओ मेरी चाँदनी...’ या गाण्याला त्यांनी स्वरसाज दिला होता. त्यानंतर त्यांनी १९९१ मध्ये पुन्हा ‘यशराज फिल्म्स्‌’च्या ‘लम्हें’ चित्रपटात काम केले. या चित्रपटातील भूमिकेसाठीही त्यांना ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला होता. 

१९९२ मध्ये त्यांनी ‘खुदा गवाह’मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत; तर १९९३मध्ये आलेल्या ‘रूप की रानी चोरों का राजा’ मध्ये अनिल कपूरसोबत काम केले होते. अनिल कपूरसोबत त्या ‘लाडला’ व ‘जुदाई’मध्येही झळकल्या होत्या.

१९९६मध्ये दिग्दर्शक बोनी कपूर यांच्याशी विवाह केल्यानंतर श्रीदेवी बराच काळ चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. २०१२ मध्ये गौरी शिंदे यांच्या ‘इंग्लिश विंग्लिश’मधून त्यांनी बॉलिवूडमध्ये दमदार ‘एन्ट्री’ केली. त्यातील त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते.  अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक बड्या अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केले. यश चोप्रा, सुभाष घई, शेखर कपूर अशा काही नामवंत दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केले. 

अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय कारकिर्दीसाठी त्यांना २०१३मध्ये केंद्र सरकारने ‘पद्मश्री’ या पुरस्काराने सन्मानित केले होते. श्रीदेवी यांना जान्हवी आणि खुशी या दोन कन्या आहेत. जान्हवी ‘धडक’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.  

गाजलेले काही चित्रपट
‘जाग उठा इन्सान’, ‘अक्‍लमंद’, ‘इन्क्‍लाब’, ‘तोहफा’, ‘सरफरोश’, ‘बलिदान’, ‘नया कदम’, ‘घर संसार’, ‘मकसद’, ‘सुल्तान’, ‘आग और शोला’, ‘भगवान’, ‘आखरी रास्ता’, ‘जाँबाज’, ‘वतन के रखवाले’, ‘जवाब हम देंगे’, ‘औलाद’, ‘नज़राना’, ‘कर्मा’, ‘हिंमत और मेहनत’, ‘निगाहें’, ‘जोशिले’, ‘गैरकानूनी’, ‘हीर राँझा’, ‘चंद्रमुखी’, ‘चाँद का टुकड़ा’, ‘गुमराह’, ‘लाडला’, ‘आर्मी’, ‘हल्लाबोल’ व ‘मॉम’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. त्यांनी छोट्या पडद्यावरही काम केले. ‘मिसेस मालिनी अय्यर’ या मालिकेतील त्यांची भूमिका गाजली होती.

गाजलेली काही गाणी
श्रीदेवी यांनी चित्रपटांमधील भूमिकांतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यांची काही गाजलेली गाणी... 

 ऐ जिंदगी गले लगाले...    सदमा (१९८३)    
 मैं तेरी दुश्‍मन...     नगिना (१९८६)
 हवाहवाई...    मि. इंडिया (१९८७)
 काँटें नहीं कटते...    मि. इंडिया (१९८७)
 ओ मेरी चाँदनी...    चाँदनी (१९८९)
 मेरे हातों में नौ-नौ चुडियाँ हैं...    चाँदनी (१९८९)
 चुडियाँ खनक गईं...    लम्हें (१९९१)
 गुस्ताख दिल...    इंग्लिश विंग्लिश (२०१२)
 नवराई माझी...    इंग्लिश विंग्लिश (२०१२)

Web Title: bollywood actress sreedevi