काहीही झालं तरी राहुल गांधींच्या पाठीशी! स्वरा भास्करचं समर्थन

अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) ही तिच्या वेगळ्या भूमिकेसाठी ओळखली जाते.
Swara bhaskar And Rahul Gandhi
Swara bhaskar And Rahul Gandhiesakal

Entertainment News: अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) ही तिच्या वेगळ्या भूमिकेसाठी ओळखली जाते. परख़ड वक्तव्यामुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या स्वरानं (Viral News) आतापर्यत आपल्या स्वभावानं अनेकांशी पंगा घेतला आहे. तिचं कॉग्रेस धार्जिणं (Congress) वागणं हे नेटकऱ्यांच्या अंगवळणी प़डल्याचे अनेकदा दिसून आले आहे. विशेष म्हणजे राहुल गांधीच्या फोटो, व्हि़डिओंना कमेंट देणे हे स्वराचे आवडते काम असल्याचे तिच्या (Viral Video) पोस्टवरुन दिसून आले आहे. तिनं यापूर्वी देखील राहुल गांधीच्या पोस्टवर (Rahul Gandhi) प्रतिक्रिया दिल्या आहेत. आताही ती अशाच एका राहुल गांधीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर कमेंट देत त्यांना आपला पाठींबा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून स्वरा ही परदेशात शिफ्ट होणार असल्याच्या चर्चा व्हायरल होताना दिसत आहे. त्यावर देखील नेटकऱ्यांना ट्विटरवरुन उत्तर दिलं आहे. त्यामध्ये तिनं मी बाहेर जावं हे नेमकं कुणाला वाटतं, माझ्या चाहत्यांना की भक्तांना अशा शब्दांत तिनं उत्तर दिलं आहे. कालपासून कॉग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी हे त्यांच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आले आहे. नेपाळमध्ये एका मित्राच्या लग्नकार्यात सहभागी होण्यासाठी गेलेल्या राहुल गांधीच्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केल्याचे दिसून आले. यासगळ्यात स्वरानं प्रतिक्रिया देऊन राहुल गांधींना पाठींबा दिला आहे. कॉग्रेसनं राहुल गांधीच्या त्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आपल्या मित्राच्या लग्नात सहभागी होणं हे काही गैर नाही. त्यामुळे त्यावरुन ज्याप्रकारे वादंग होतो आहे तो चुकीचा असल्याचे पार्टीच्या वतीनं सांगण्यात आले होते.

Swara bhaskar And Rahul Gandhi
ईदच्या पार्टीत शहनाझ-सलमानची जवळीक कॅमेऱ्यात कैद; kiss करतानाचा Video Viral

प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी देखील राहुल गांधीच्या त्या व्हिडिओचे समर्थन केले आहे. जर कुठलाही नेता नाईट क्लबमध्ये जात असेल तर ते संसदेत पॉर्न पाहण्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगले आहे. यावर कॉग्रेसचे श्रीनिवास बीवी यांनी अटल बिहारी यांचा एक फोटो शेय़र केला असून त्यामध्ये ते एका पार्टीमध्ये असल्याचे दिसत आहे. त्यावरुन एका वेगळ्या वादाला सुरुवात झाली आहे. स्वरानं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, गोदी मीडिया अशा प्रकारे वागताना दिसतो आहे. तो नशेत आहे.

Swara bhaskar And Rahul Gandhi
Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com