Dobaaraa Movie: तापसी - अनुराग कश्यपचा 'दोबारा' लंडनच्या थिएटरात|Bollywood Actress Taapsee pannu Dobaaraa | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood Actress Taapsee pannu Dobaaraa screening  news

Dobaaraa Movie: तापसी - अनुराग कश्यपचा 'दोबारा' लंडनच्या महोत्सवात

Dobaaraa Movie: बॉलीवूडमध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनय शैलीनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नु. या अभिनेत्रीनं कमी कालावधीत अमाप लोकप्रियता मिळवली आहे. विचारपूर्वक चित्रपटांची केलेली निवड, संवाद कौशल्य, अभिनयाच्या जोरावर तिनं सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री म्हणून (Bollywood News: स्थान मिळवले आहे. गेल्या काही दिवसांपासून तापसी ही चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिचा दोबारा नावाचा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप (Bollywood Director Anurag Kashyap) दिग्दर्शित य़ा चित्रपटाचं स्क्रिनिंग आता लंडनमध्ये होणार असल्यानं त्याच्याविषयी खास उत्सुकता आहे.

तापसी पन्नू अभिनित अनुराग कश्यपच्या 'दोबारा'चा 23 जून रोजी लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमिअर होणार आहे. एकता आर कपूर आणि अनुराग कश्यप (Bollywood Movies) यांचा बहुप्रतिक्षित नवीन काळातील थ्रिलर 'दोबारा' 19 ऑगस्ट 2022 ला प्रदर्शित होत आहे. यात आणखी रोमहर्षकता आणत, तापसी पन्नू अभिनित लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर होणार आहे. दिग्दर्शक-अभिनेता जोडी 23 जून, संध्याकाळी 6 वाजता #LIFF2022 ओपनिंग नाईट गालामध्ये चित्रपट सादर करणार आहेत.

पुरस्कार विजेती अभिनेत्री तापसी पन्नू अभिनित या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी केले आहे आणि शोभा कपूर आणि एकता आर कपूर (कल्ट मूव्हीज, बालाजी टेलिफिल्म्स अंतर्गत नवीन शाखा) आणि सुनीर खेतरपाल आणि गौरव बोस (एथेना) यांनी याची निर्मिती केली आहे. दोबारा हा नव्या जमान्यातील थ्रिलरपट असून यामध्ये तापसी आणि अनुराग तिसऱ्यांदा एकत्र येत आहेत. दोबारासोबत, तापसी आणि पावेल गुलाटी यांची हिट जोडी थप्पडच्या जबरदस्त यशानंतर पुन्हा एकत्र दिसणार आहे.

दोबारा, बालाजी मोशन पिक्चर्स, कल्ट मूव्हीजच्या नवीन विभागातील पहिला चित्रपट असून, आकर्षक, वेगवान आणि शैलीदार कथा सांगतो. हा चित्रपट 19 ऑगस्ट 2022 रोजी जवळच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.