Brahmastra Trailer: तुम्हाला ट्रेलरमध्ये दीपिका दिसली का? |Bramhastra Movie trailer Actress Deepika Padukone | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranbir Kapoor Bramhastra movie trailer news

Brahmastra Trailer: तुम्हाला ट्रेलरमध्ये दीपिका दिसली का?

Bramhastra Movie: अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्रचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याच्याबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या (Movie Trailer) आहेत. बिग बी अमिताभ बच्चन, टॉलीवूडचा सुपरस्टार नागार्जुन, मौनी रॉय अशी स्टारकास्ट असणाऱ्या ब्रम्हास्त्रमध्ये किंग खान शाहरुखचा लूक (Entertainment News) देखील दिसल्याचे नेटकऱ्यांनी सांगितले आहे. यासगळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणची एक झलक ट्रेलरमध्ये व्हायरल झाल्याची बातमी सोशल मीडियावर ट्रेडिंग आहे. रणबीरची कोणेएकेकाळची (viral news) गर्लफ्रेंड असणाऱ्या दीपिकाचा ब्रम्हास्त्रमध्ये लूक पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या ट्रेलरमध्ये खरचं दीपिका आहे का असा प्रश्नही काही नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की, त्या (social media news) चित्रपटामध्ये जल (पाणी) ची भूमिका दीपिकानं साकारली आहे. तिची झलक त्या ट्रेलरमध्ये दिसून आली आहे. मात्र काही सेकंदच ती दिसत असल्यानं ती खरचं दीपिका आहे का आणखी कुणी असा प्रश्नही विचारला जातोय. ती रहस्यमयी स्त्री दुसरी तिसरी कुणी नसून दीपिकाच आहे. 9 सप्टेंबर रोजी रणबीर - आलियाची मुख्य भूमिका असलेला ब्रम्हास्त्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून ब्रम्हास्त्रची चर्चा आहे. वास्तविक हा चित्रपट दोन ते तीन वर्षापासून लांबणीवर पडला आहे. कोरोनाचा सामना त्याला करावा लागला. त्यामुळे अनेकदा त्याच्या चित्रिकरणाला विलंबही झाला. आता तो पूर्णत्वाच्या वाटेवर असून एडिटिंग, डबिंगचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 4 के मध्ये सोशल मीडियावर पाहायला मिळाला आहे. अॅक्शन, सस्पेन्स, थ्रिलर या प्रकारातील ब्रम्हास्त्रची प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. ज्यावेळी ट्रेलर व्हायरल झाला. त्याचवेळी नेटकऱ्यांनी ट्रेलरचे पोस्टमॉर्टेम केल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: Bollywood V/S South : तुला साऊथचे चित्रपट आवडतात का? रणवीर सिंगचं कडक उत्तर

ब्रम्हास्त्रच्या 4 के ट्रेलरमध्ये चाहत्यांना दीपिकाची झलक दिसून आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर तिला पाहिल्याचा पुरावा म्हणून काही स्क्रीन शॉट देखील शेयर केले आहेत. जेव्हा त्या अभिनेत्रीची इंट्री होते त्याचवेळी अमिताभ जल या तिच्या भूमिकेविषयी सांगु लागतात. एका युझर्सनं म्हटलं आहे की, ती दीपिकाच आहे. तिनं जलदेवीची भूमिका साकारली आहे.

हेही वाचा: Shabaash Mithu Trailer: 'असं खेळणार की कुणीही ओळख विसरणार नाही'!

Web Title: Bramhastra Movie Trailer Actress Deepika Padukone Spot Fans Comment Viral Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top