माझ्या टी शर्टकडं पाहा म्हटलं!: उर्फीनं फोटोग्राफर्सला... |Bollywood actress urfi Javed post | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi Javed
माझ्या टी शर्टकडं पाहा म्हटलं!: उर्फीनं फोटोग्राफर्सला...

माझ्या टी शर्टकडं पाहा म्हटलं!: उर्फीनं फोटोग्राफर्सला...

मुंबई - ओटीटी प्लॅटफॉर्मवरील (OTT platform) बिग बॉसमध्ये (Bigg Boss) सहभागी झालेली उर्फी (Urfi Javed) ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर (Social Media) आपल्या हटकेपणामुळे ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. आताही तिनं टी शर्टवर जावेद अख्तर (javed Akhtar) यांचं नाव आणि हातात भगवद् गीता घेतली आहे. असा फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्यामुळे तिला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नही विचारले आहेत. काहींनी तिला नेहमीप्रमाणे ट्रोल देखील केलं आहे. मी काही जावेद अख्तर यांची नात नाही. असं त्या टी शर्टवर लिहिलं आहे. त्यामुळे उर्फीवर वेगवेगळ्या प्रश्नांची सरबत्ती होताना दिसत आहे.

त्यांच कारण असं की, उर्फीचं (Urfi Javed) आडनाव हे अख्तर आहे. त्यामुळे तिचं नाव हे नेहमीच जावेद अख्तर यांच्याशी जोडलं गेलं आहे. त्यावरुन तिला ट्रोलही केलं गेलं आहे. एखाद्या वेळी जावेद अख्तर यांनी कोणती वादग्रस्त कमेंट केली की, त्यामुळे उर्फीला देखील अनेकदा ट्रोल व्हावं लागल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तिनं आता अशाप्रकारचा वेगळा गेट अप केल्याची चर्चा आहे. जावेद अख्तर असं नाव लिहिलेलं टी शर्ट परिधान करुन उर्फीनं पापाराजीसोबत बराचसा वेळ व्यतीत केला आहे. तिच्या व्हायरल झालेल्या त्या फोटोंवरुन तिला नेटकऱ्यांनी त्रस्त केलं आहे. मी माझ्या टी शर्टवर जे लिहिलं आहे त्याकडे तुमचं लक्ष असू द्या असं तिनं फोटोग्राफर्सला सांगितलं आहे.

हेही वाचा: न्यासा देवगणची बॉलीवूड एन्ट्री ठरली; तिच्या बोल्ड फोटोनी दिले संकेत..

उर्फीनं पापाराझींना म्हटलं की, मी आता हे ऐकून वेडी झाली आहे की माझं आणि जावेद अख्तर यांचं काही नातं आहे म्हणून. जेव्हा कुणी मला व्टिट करत तेव्हा जावेद अख्तर यांची नात आहे हिला काहीतरी शिकवा असं सांगितलं जातं. मला हे ऐकुन कंटाळा आला आहे. यापूर्वी शबाना आझमी यांच्या प्रसिद्धी टीमनं आपला उर्फीसोबत काही संबंध नसल्याचे म्हटलं आहे.

हेही वाचा: हॉलीवूड अभिनेत्री बेट्टी व्हाईट यांचे निधन

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top