न्यासा देवगणची बॉलीवूड एन्ट्री ठरली; तिच्या बोल्ड फोटोनी दिले संकेत.. Nysa Devgan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nysa Devgan

न्यासा देवगणची बॉलीवूड एन्ट्री ठरली; तिच्या बोल्ड फोटोनी दिले संकेत..

काजोल आणि अजय देवगणनं नेहमीच आपल्या मुलांना बॉलीवूडपासनं लांब ठेवलंय. इतर स्टार कीड्ससारखी त्यांची मुलं कधीच फार लॅमलाइटमध्ये दिसली नाहीत. त्यांची मुलगी न्यासा देवगण तर लहानपणापासूनच शिकण्यासाठी सिंगापूरमध्ये होती. त्यात त्यांची दोन्ही मुलं दिसायला तशी सामान्य फार गोरी-गोमटी,देखणी या प्रकारात मोडणारी नाहीत. सुरुवातीला तर त्यांच्या मोठया मुलीला न्यासाला(Nysa Devgan) सोशल मीडियावर अतिशय वाईट कमेंट्सचा सामना करावा लागला होता. पण ती जस जशी मोठी होत गेली तसतसं तिच्या पर्सनॅलिटीत कमालीचा फरक पडत गेला.

नुकतेच न्यासाने ब्लॅक ड्रेस परिधान केलेले हॉट लूकचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यात एका फोटोत तिनं मिरर लूक देत स्वतःचा सेल्फी काढतानाची पोज कॅमे-यात बंदिस्त केलीय. तर काजोलच्या ब्लॅक ड्रेसमधील एक जुना फोटो आपल्यासोबत पोस्ट केलाय. जो २०१७ सालातला आहे. या फोटोला पाहून न्यासा काजोलसारखी दिसत असल्याचा भास होतोय. जे नेटिझन्स न्यासाला काही दिवसांपूर्वी कशी दिसते यावरनं हिणवतं होते त्यांनीच तिला खूप सुंदर सुंदर अशा कमेंट्स दिल्या आहेत. तिचा हा हॉट लूक बॉलीवूडमध्ये येण्याचे तिचे संकेत असल्याचं दर्शवत आहे एवढं मात्र नक्की. न्यासाचा सोशल मीडियावर आता फॅन फॉलॉइंगही जबरदस्त आहे. तिच्या फॅन्सनी तिच्या नावाने अनेक पेजेस क्रिएट केलेयत. आता स्टार होण्याची ही सुरुवात म्हणायची की नाही. म्हणून आपलं आम्ही म्हटलं,न्यासा लवकरच बॉलीवूडमध्ये,त्यात चुकलं कुठे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top