Akshay Kumar: लग्न म्हणजे ‘मौत का कुंआ’, बायकोसोबत व्हिडिओ शेअर करत असं का म्हणाला अक्षय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshay Kumar

Akshay Kumar: लग्न म्हणजे ‘मौत का कुंआ’, बायकोसोबत व्हिडिओ शेअर करत असं का म्हणाला अक्षय?

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांना बॉलिवूडचं परफेक्ट कपल म्हटले जाते. ही बी टाउन मधली लोकप्रिय जोडी आहे. त्यांच्या लग्नाला आता बाविस वर्षापासून ते संसार करत आहेत . अक्षय आणि ट्विंकल यांना आरव आणि नितारा ही दोन मूलं आहेत. (Akshay Kumar Shared Funny Video)

हेही वाचा: Pushpa: पुष्पा का फिव्हर रुकेगा नही साला! रशियन बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा'चा धुराळा...

अलीकडेच, अक्षयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो नवीन वर्षाच्या निमित्ताने कुटुंबासह सर्कसचा आनंद लुटतांना दिसत आहे. पण व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लग्नाला ‘मौत का कुंआ’ असं म्हटलं आहे. अक्षय कुमारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे ही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

खरंतर अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात एक व्यक्ती ‘मौत का कुंआ’ मध्ये सुसाट वेगानं दुचाकी चालवताना दिसतोय. ज्याला पाहून ट्विंकल खूपच थक्क झाली आणि तिने अक्षयला विचारल की याला काय म्हणतात?

हेही वाचा: Ketaki Chitale: "हिंदू आहेस ना", नेटकऱ्याने झापलं तर केतकीनं डायरेक्ट शिवीचं ...

त्यानंतर अक्षय पत्नीला सांगतो की ते ‘मौत का कुंआ’ आहे. अभिनेत्यानं व्हिडिओ शेअर करत खुप मजेदार कॅप्शन दिलयं, 'काल माझ्या कुटुंबाला एक जून्या पद्धतीची सर्कस पाहायला मिळाली. बायकोनं विचारलं या सर्कसला काय म्हणतात? मी तिला सांगू शकलो असतो की याला लग्न म्हणतात.' अशी इच्छा त्यांन व्यक्त केलं. त्यापुढे त्यांनी हॅश टॅगमध्ये ‘मौत का कुंआ’ लिहिलं आहे.