Brahmastra: म्हणून आलिया होतीय ट्रोल, तब्बल इतक्यावेळा केला ‘ब्रह्मास्त्र’मध्ये शिवाच्या नावाचा जप... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Brahmastra
Alia Bhatt

Brahmastra: म्हणून आलिया होतीय ट्रोल, तब्बल इतक्यावेळा केला ‘ब्रह्मास्त्र’मध्ये शिवाच्या नावाचा जप...

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या मूख्य भूमिका असलेल्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाला प्रेक्षकांनी समिश्र प्रतिक्रिया दिल्यात. काहींना या चित्रपटातील रणबीरचा अभिनय आवडला चर काहींनी यात वापरण्यात आलेल्या  VFX चं कौतूक केलं. त्याच प्रमाणे याचित्रपटा संदर्भात भन्नाट मीम्सही व्हायरल झाले.

हे सर्व “केसरिया” या गाण्यातील “लव्ह स्टोरीया” या कडव्यापासून सुरु झाले ते आलियाच्या ईशा या भूमिकेने 'शिवा' नावाने किती वेळा हाक मारल्यान्यापर्यन्त सुरुच होते. या चित्रपटात आलियाने इतके डॉयलॉग बोलले नसतील तितक्या वेळा तिने शिवाचं नाव घेतलं होतं. यामूळे तिच्या नावाचे मीम्सचं नाही तर व्हिडिओही बरेच व्हायरल झालेत आणि तिला प्रचंड ट्रोलही करण्यात आलं. या चित्रपटात कितीवेळा तिनं शिवा नावाने हाक मारली याचाही शोध नेटकरी घेत होते.  

आता हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारच्या स्ट्रीमिंगवर उपलब्ध आहे, डिस्ने प्लस हॉटस्टारने चाहत्यांचा हा प्रश्न सोडवण्यात मदत केली आहे. यासाठी त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओत ईशा चित्रपटात 'शिवा' म्हणत असलेला एक सुपरकट दाखवण्यात आला आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, यात दहा बारा वेळा नव्हे तर ईशाने तब्बल 103 वेळा शिवा ही हाक मारल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा: Alia-Ranbir: कोविड चाचणी निगेटिव्ह आल्याशिवाय बाळाला भेटू देणार नाही! आलिया-रणबीरचा फतवा

याआधी आलियाने होणाऱ्या टीकेवर प्रतिक्रिया दिली होती आणि एका मुलाखतीत ती म्हणाली होती, "मी चित्रपटात शिवा किती वेळा म्हटले आहे यावर लोक अक्षरशः ड्रिंकिंग गेमही खेळू शकतात." दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनाही याबद्दल सांगितलं होतं की, “मला वाटतं की मी बोलतो तेव्हा मी लोकांची नावे घेतो, ही माझी सवय आहे. त्यामुळे ते स्क्रिप्टमध्येच राहिले आणि चित्रपटातही आले.”

हेही वाचा: Alia Bhatt: डिलीव्हरीनंतर आलिया भट्टचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, पाहून लोक म्हणू लागलेयत...

तर रणबीरने असेही सांगितले की, जेव्हा त्याने आणि आलियाने अयानला प्रश्न केला की ईशा इतक्या वेळा 'शिवा' का म्हणते यावर अयान म्हणाला होता की  हे खूप खास होते की जेव्हा कोणी प्रेमात पडतो तेव्हा आपल्या आवडत्या व्यक्तीचे नाव घेण्यास वेगळाच आनंद होतो.

हेही वाचा: Brahmastra च्या ओटीटी रीलिजमुळे 'ब्रह्मास्त्र 2' च्या कास्टचं सीक्रेट झालं ओपन; समोर आली दोन मोठी नावं

ब्रह्मास्त्रने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 430 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन , डिंपल कपाडिया, मौनी रॉय, शाहरुख खान आणि नागार्जुन यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचा सिक्वलही लवकरच सुरु होणार असल्याच्या चर्चा आहेत.