Anu Malik: 'अर्ध्या रात्री...' अनु मलिकच्या त्या सवयीचा पत्नीला प्रचंड राग |Bollywood Anu Malik wife Anju Malik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anu malik news

Anu Malik: 'अर्ध्या रात्री...' अनु मलिकच्या त्या सवयीचा पत्नीला प्रचंड राग

Anu Malik Interview - हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या संगीतानं चाहत्यांना वेड लावणाऱ्या संगीतकारांमध्ये अनु मलिक यांचं नाव घेतलं जातं. भलेही या गायकावर आतापर्यत वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले असतील मात्र त्यांनी ज्या (bollywood News) चित्रपटांना संगीत दिलं ते चित्रपट अजुनही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. दम लगा के हायशा या चित्रपटासाठी अनु मलिक यांनी दिलेल्या संगीताला चाहत्यांनी पसंत केले होते. याशिवाय वेगवेगळ्या रियॅलिटी शो मध्ये देखील त्यांचा हटके अंदाज हा कायमच सोशल मीडियावर चर्चेत राहिला आहे. (Bollywood Movies)

आता अनु मलिक यांच्या नावाची वेगळ्या प्रकारे चर्चा सुरु झाली आहे. अनु मलिक (entertainment news) बॉलीवूडमधील दिग्गज संगीतकारांपैकी एक आहेत. ज्यांची गाणी ऐकणारा स्वतंत्र प्रेक्षकवर्ग आहे. ते नेहमीच आपल्या तऱ्हेवाईक सवयींमुळे चर्चेत राहिले आहेत. सोशल मीडियावर फारसे सक्रिय नसणाऱ्या अनु मलिक (Anu malik) रियॅलिटी शो मधून मात्र चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. आता त्यांच्या पत्नीनं केलेला एक खुलासा चर्चेत आला आहे. त्यांच्या पत्नीचे नाव अंजु असे आहे. एका गोष्टीमुळे त्यांच्यात नेहमीच वाद होतात.

अनु मलिक यांना एक अशी सवय आहे की, ज्यामुळे त्यांची पत्नी त्यांच्यावर (Viral news) वैतागते. गेल्या अनेक वर्षांपासून अनु मलिक त्या सवयीनं त्रस्त आहे. त्याचा परिणाम त्यांच्या वैवाहिक आयुष्यावरही झाल्याचे दिसून आले आहे. अनु मलिक यांनी एका मुलाखतीच्या दरम्यान धक्कादायक खुलासा केला होता. त्यात त्यांनी सांगितलं होतं की, रात्री झोपल्यानंतर अचानक कधीही एखादी चाल सुचते. काही वेळेला तर अर्ध्या रात्री देखील अशा अनेक चाली सुचल्या आहेत. त्यानंतर मी लगेच ती कंपोझ करायला घेतो. त्याचा परिणाम म्हणजे आमच्यात अनेकदा वाद झाले आहेत.

हेही वाचा: Video: आपल्याला दोन्ही हातच नसेल तर?...

माझ्या अशा या तऱ्हेवाईक सवयीचा पत्नी अंजुला खूप त्रास होत असल्याचे अन्नु मलिक सांगतात. मी आवर्जुन वेळ काढून कुटूंबाला बाहेर फिरायला घेऊन जात (social media viral news) असतो. मात्र त्यावेळी देखील माझ्या वेगळ्या सवयीमुळे कुटूंबाकडून बोलणी खातच असतो. असेही मलिक आवर्जुन सांगतात.

हेही वाचा: Video: काजलला झाले अश्रु अनावर

Web Title: Bollywood Anu Malik Wife Anju Malik And Daughters Midnight Composing Habit

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..