Cruise Drugs Case: सॅनिटरी पॅडमध्ये लपवलं होतं ड्रग्ज, कोण आहे ती?

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलाला आर्यनला एनसीबीनं अटक केल्यानंतर त्या प्रकरणामध्ये आणखी काही नावं समोर आली आहे.
Cruise Drugs Case: सॅनिटरी पॅडमध्ये लपवलं होतं ड्रग्ज, कोण आहे ती?

मुंबई - बॉलीवूडचा (bollywood) किंग खान शाहरुखच्या मुलाला (king khan shahrukh khan) आर्यनला एनसीबीनं अटक केल्यानंतर त्या प्रकरणामध्ये आणखी काही नावं समोर आली आहे. ड्रग्ज त्या क्रुझवर नेण्यासाठी संबंधित व्यक्तींनी कोणकोणत्या ट्रीक वापरल्या होत्या याची माहिती यानिमित्तानं समोर आली आहे. आर्यन खान सोबत नूपुरही एनसीबीच्या जाळ्यात आहे. तिच्याबाबतची एक मोठी माहिती समोर आली आहे. त्यात तिनं कशापद्धतीनं ड्रग्ज क्रुझवर नेले याविषयीचा धक्कादाय़क खुलासा उघड झाला आहे. त्यामुळे बॉलीवूडसह इतर सेलिब्रेटींचीही डोकेदुखी वाढली आहे. सध्या आर्यन खानला 7 ऑक्टोबरपर्यत कोठडी सुनावण्यात आली आहे. एनसीबीनं आता वेगवेगळ्या प्रकारची माहिती उजेडात आणली आहे. आर्यनसोबत इतर नऊ आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

एनसीबीनं ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्याकडून काही वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. यावेळी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काहींनी डब्ब्यामध्ये, तर काहींनी सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज लपवून आणले होते. एनसीबीच्या तपासातून या गोष्टी समोर आले आहेत. मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या त्या क्रुझवर आर्यन खान सहित जे इतर सहकारी होते त्यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. एनसीबीनं सापळा रचून त्या क्रुझवर छापा टाकला. त्या कारवाईतून त्यांनी काहींना अटकही केली आहे. त्यापैकी बॉलीवूडचा स्टार अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. तो सध्या एनसीबीच्या कोठडीत आहे. याशिवाय मुनमुन धमेचालाही ताब्यात घेण्यात आले आहे. ती मध्यप्रदेशातील असून सध्या दिल्लीमध्ये राहते. मुनमुनच्या प्रोफाईलवर नजर टाकल्यास ती मॉडेल असल्याचे दिसून आले आहे. तिनं रँप वॉक करतानाचे फोटो व्हायरल केले आहेत.

नुपूर सारिकानं आता घटनेच्या निमित्तानं चर्चेत आली आहे. ती एक शिक्षिका आहे. तिला एकानं ड्रग्ज दिले होते. तिनं सॅनिटरी पॅडमध्ये ते लपवले असल्याची माहिती पुढे आली आहे. एनसीबीनं तिच्याकडून ड्रग्ज जप्त केले आहे. याशिवाय या प्रकरणामध्ये इस्मित सिंग, मोहक जसवाल, विक्रांत चोकर यांनाही एसीबीनं ताब्यात घेतलं आहे. मोहक जसवाल हा दिल्लीत राहणारा आहे. तो आयटी प्रोफेशनल आहे. त्याच्याकडे परदेशात काम करण्याचा अनुभवही आहे. त्यानं मुंबईत एका लोकलमधून अनोळखी व्यक्तीकडून ड्रग्ज घेतलं होतं. आणि ते ड्रग्ज नुपूरला दिले. तिला ते ड्रग्ज सॅनिटरी पॅडमध्ये लपवण्याचा सल्लाही दिला होता. आपण ज्यावेळी त्या पार्टीमध्ये जाऊ तेव्हा ते आपल्याला परत देण्यास सांगितले होते.

Cruise Drugs Case: सॅनिटरी पॅडमध्ये लपवलं होतं ड्रग्ज, कोण आहे ती?
आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी; पाहा व्हिडिओ
Cruise Drugs Case: सॅनिटरी पॅडमध्ये लपवलं होतं ड्रग्ज, कोण आहे ती?
आर्यन खानसह तिन्ही आरोपी विदेशी ड्रग्स तस्करांच्या संपर्कात - NCB

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com